पंढरपूर // प्रतिनिधी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी उद्योग व्यवसाय अडचणीत आलेले असताना अशात शेतक-यांवरही मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.
सरकारने वेळोवेळी विविध योजनेअंतर्गत शेतक-यांना पिक कर्ज उपलब्ध करून देत असतात
पंढरपूर येथील कृषी अधिकारी श्री.झिरपे साहेब व बॅंक ऑफ महाराष्ट्र चे शाखा प्रबंधक हे माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. शेतक-यांची हेलपाटाण्याच त्यांची पिळवणूक होत आहे.
शासनाच्या आदेशानुसार शेतक-यांना पिक कर्ज देणे हे बंधनकारक आहे परंतु संबंधित अधिकारी फाॅर्म व माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे.
कोविड 19 योजनेअंतर्गत जे लाभार्थी शेतक-यांना या लाभापासुन वंचित ठेवण्याचे काम होत आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्या प्रमाणे चालू पिक कर्ज असल्यास वाढीव कर्ज कोविड 19 या योजनेंतर्गत दिली जाते परंतु. चालू कर्जदारांना थकबाकीदार दाखवून व काही शेतकऱ्यांचे वन टाइम सेटलमेंट केल्याने व कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने शेतकऱ्यांचे सिबिल खराब दाखवत आहेत त्या अनुषंगाने शासनाने सदर शेतकऱ्याला कर्ज देण्याचा आदेश काढलेला असतानासुद्धा काही गोरगरीब शेतकऱ्यांना या योजनेपासून लांब ठेवून लाभ मिळवून न देण्याचा प्रयत्न बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपुर शाखेतील व कृषी अधिकारी झिरपे साहेब हे करीत आहेत या सर्वांचे चौकशी करून या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना वरील सर्व योजनांचा लाभ मिळावा सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या सेवेतून सेवानिवृत्त करावे अशा आशयाची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब, प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब, सोनवणे साहेब तांदळे साहेब यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे.. यावेळी बळीराजा शेतकरी संघटना जिल्हाउपाध्यक्ष रमेश भोसले,सचिन शिंदे,दत्ता माने,बंडू माने इतर पदाधिकारी होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.