माढ्यातील बेकरी चालकाच्या हत्येचे गूढ उकलले; मुलानेच केली चारित्र्यहीन बापाची हत्या




पंढरपूर // प्रतिनिधी 
टेंभुर्णी येथील बेकरी चालकाच्या हत्येचा छडा पोलिसांनी लावला आहे. मुलानेच सहकाऱ्यांच्या मदतीने बापाची हत्या केल्याचं उघड झालं आहे. माढा तालुक्यातील शिराळ( टें) येथील एका व्यक्तीचा अत्यंत क्रुरपणे खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार काल उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी 24 तासात या हत्येचा गुंता सोडवला असून चारित्र्यहीन बापाची हत्या त्याच्या पोटच्या पोराने केल्याचे समोर आले आहे.


पोलिसांनी सध्या या प्रकरणात हत्या झालेला संजय काळे याचा मुलगा व या प्रकरणातील फिर्यादी आकाश काळे यांच्यासह त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे. संजय काळे यांना टेंभर्णी-अकलूज रोडजवळील उजनी डावा उजवा कालव्याच्या साईटपट्टीला मारून त्यांचा मृतदेह वाहनासह जाळून टाकण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात करमाळा पोलीस उपअधीक्षक प्रशांत हिरे यांनी संजय काळे याची माहिती गोळा करताना त्याचे चारित्र्य संशयास्पद वाटल्याने अधिक चौकशी करता त्याचा मुलगाच यात सामील असल्याचा संशय आल्यावर त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलघडा झाला.

या हत्येत आकाश याने त्याचे मित्र लक्ष्मण बंदपट्टे व आलम मुलाणी यांची मदत घेतल्याचे कबूल केले. वडिलांच्या वादग्रस्त चारित्र्यामुळे या बाप-लेकात कायम वादंग होत होते. याच वादातून आकाश याने वडिलांची हत्या करून वाहनावर त्यांचा मृतदेह ठेवून जाळण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


रविवारी (26 जुलै) शेवरे येथे उजनी कालव्याचा उजव्या बाजूचा रस्त्यालगत लोकांना एक वाहन पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसून आलं होतं. काही नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेहही दिसला. हा मृतदेह संजय काळे यांचाच असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. शरीराचे छातीपासून थोडावरचा भाग शीर आणि एक हात शाबूत होता. उर्वरित शरीर पूर्णपणे जळून खाक झाले होते. चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह वाहनासह जाळण्यात आला होता.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget