पंढरपूर प्रतिनिधी:-पंढरपूर येथे आषाढी वारीची सांगता विधीवत नियमांनप्रमाणे श्री.विठ्ठलाच्या प्रक्षाळ पुजेने होत असते परंतु यावर्षी आषाढी वारीची सांगतेची प्रक्षाळ पुजा श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते असताना यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी या पुजेला हजर राहिले व त्यांनी पुजेवेळी चेष्टा-मस्करी करत स्वत:ची ही प्रक्षाळ पुजा करून घेत शेकडो वर्षांच्या परंपरेला गालबोट लावत हा वारकरी संप्रदायाचा आपमान आहे.
याप्रकररामुळे अनेकांच्या भावना दुखवल्या आहेत व नियंमांचे उल्लंघन केले असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय किरण घाडगे यांनी व्यक्त केले सदर श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी जोशी यांना बडतर्फ करण्याची मागणी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली असल्याची संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय किरण घाडगे यांनी दिली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.