पंढरपूर // प्रतिनिधी
आज पंढरपूर येथे उपोषणाचा पहिला दिवस पार पडला असून उपोषणाला भेट देण्याकरिता सरकारचा एकही प्रतिनिधी न आल्यामुळे सरकारची वारकऱ्यांन विषयी उदासीनता दिसून येत आहे येणाऱ्या तीन तारखेच्या ईद करता सरकारने कितीतरी मिटिंग घेतल्या पण महाराष्ट्रामध्ये 75 टक्के वारकरी संप्रदाय असल्यानंतर वारकऱ्यांच्या मागणीकडे सरकार बुद्धी पुरस्कर दुर्लक्ष करत आहे आणि ही फार मोठी खेदाची बाब आहे.
आम्ही आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत पण आमच्या सहिष्णुतेचा सरकारने भंग केला असून येत्या दोन दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रभरातून चलो पंढरपूर नारा लावून हजारो भाविक आम्ही पंढरपूर मध्ये दाखल करणार आहोत आणि सुव्यवस्था व कायद्याचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील आम्हाला महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटना यांचा लेखी स्वरुपात पाठिंबा मिळालेला आहे वंचित बहुजन आघाडी एडवोकेट श्री प्रकाश भाऊ आंबेडकर साहेब यांचा लेखी स्वरुपात पाठिंबा मिळाला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात विश्व वारकरी सेनेच्या आमरण उपोषणाची खूप मोठी चर्चा चालू असताना सरकारचं दुर्लक्ष असणे ही खेदाची बाब आहे.
विश्व वारकरी सेना भारत

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.