पंढरपूर प्रतिनिधी:- मोहोळ तालुक्यातील टाकळी शिकंदर येथील सरस्वती विद्यालय व कर्मवीर भीमराव महाडिक कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100% विद्यार्थ्यांचा मार्च 2020 इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.
यावेळी १)कु कुलकर्णी श्रध्दा रामकृष्णहरि-प्रथम क्रमांक-९२•२०%२)कु खरात प्राजक्ता तानाजी-द्वितीय क्रमांक-९०•६०%3)कु तेरवे सानिका अरूण-द्वितीय क्रमांक-९०•६०%4)कू वाघमोडे वैभव विष्णूपंत-तृतीय क्रमांक-८९•६०% या विद्यार्थ्यांनी 2020 दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
यावेळी विद्यालयाच्या सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.खा.श्री धनंजय ऊर्फ मुन्नासो महाडीक,संस्था सचिव- मा. श्री श्रीधर बिरजे,संस्था उपाध्यक्ष-मा.श्री सुधीर भोसले,मुख्याध्यापक-श्री राजीव यादव,संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी तसेच पालक यांनी अभिनंदन केले व सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.