पायात काटा टोचला तर त्याची कळ आपल्या मस्तकात जाते त्या प्रंचड वेदना कशा सहन होतात
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
एवढ्या जखमेच्या किती वेदना होत असतील.कोणाला सांगायचं म्हटलं तर कोणी जवळ येत नाही.अशा परिस्थितीत हे सगळं त्या मनोरुग्णाने कस सहन केल असेल हे त्याच्या जीवालाच माहीत.त्याच्या पायाला कशामुळे जखम झाली हे माहीत नाही पण जखमेत खुप इन्फेक्शन होऊन भोक पडल होत "कोणाला सांगायच्या ह्या वेदना त्याने" माणूस अशा मनोरुग्ण माणसा जवळ सुध्दा जात नाही...! फक्त सहन करणे त्याच्या नशिबी असत,याच जिवंत उदाहरण आज मला अकलुजच्या स्टँड जवळ बघायला मिळालं.मला सुद्धा त्याच्या जखमेमुळे होणाऱ्या वेदना बघुन गलबलुन आल आणि मी त्या मनोरुग्ण व्यक्तीस दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षा थांबवण्यासाठी हात करत होतो. माझ्याकडे आणि मनोरुग्णाकडे पाहुन कोणच रिक्षा थांबवत नव्हता.त्यामुळे माझ्यातल्या क्रुर माणसाला जागे व्हाव लागत आणि दमाची भाषा माझ्याकडून सुरू होते.शेवटी मला माझ्या काकाची रिक्षा बोलावून हॉस्पिटल पर्यंत त्या मनोरुग्नाला घेऊन जावं लागलं...!
माझ्या वडिलांनी मला एकदा सांगितलं नागेश थोरात हा मनोरुग्ण "भैय्या माझा वर्गमित्र आहे" आणि त्या शब्दावर मी त्याच्यावर कायम लक्ष ठेऊन असतो...!
आज दि ३०/७/२०२० सकाळी नाष्टा करण्यासाठी ७.३० च्या दरम्यान गावात निघालो आणि या मनोरुग्णाने मला आवाज दिला
" ये इकडे ये रे " मी तसाच माघारी येतो,असे म्हणून तिथून निघून गेलो.आणि माझा नाष्टा संपवून त्या मनोरुग्णास पण नाष्टा घेऊन आलो.नाष्टा देताना माझ्या लक्षात आलं की हे दररोज गावात फिरत असतात.पण बऱ्याच दिवसंपासून फिरताना दिसत नाहीत.म्हणून मी त्याला विचारले फिरत का नाही.त्याने मला पायाला (पिंडरी) बांधलेलं कापड सोडून दाखवलं.तेथे रक्ताने माखलेली जखम मला दिसली भोक पडल होत.असह्य वेदनेवर मात करुन तो जगत होता.त्या वेदना मला माझ्यात जाणवु लागल्या.मग हॉस्पिटल मध्ये त्यांना उपचारसाठी घेऊन गेलो.जखम पूर्ण घुवून काढली आणि ड्रेसिंग करून घेतली.तीन दिवसाच्या टप्प्याने तीन ते चार वेळेस ड्रेसिंग करायचे आहे.असे डॉक्टरने मला सांगितले.उपचार झाल्या नंतर त्यांच्या तोंडावर जे वेदने शिवाय हळव हसू होत ते माझ्या जिवाला सुख लावणार होतं...! त्याने प्रचंड होणाऱ्या वेदनेवर विजय मिळवला होता.
लाँकडाँन नंतर मुंबईचे हॉस्पिटल चालू झाले की यांना उपचारासाठी घेऊन जाईन.
खूप दिवसापासून जिवाच्या आकांताने मी अशा मनोरुग्ण लोकांच्या सेवेसाठी एखादी मोडकी तोडकी ॲम्बुलन्स घेण्यासाठी प्रयत्न करतोय आणि स्वतः चैन न करता पैसे जमवतोय म्हणजे अशा लोकांसाठी मला उपयोगी पडेल. आणि अजून मनोरुग्ण मी मोठ्या हॉस्पिटल मध्ये दाखल करून परत त्यांना माणसात घेऊन येईन.असो थोडा वेळ लागेल पण होईल...!
आपला
शेखर राजाभाऊ खिलारे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.