आरोग्य सभापती विवेक परदेशी कडुन नगरपालिकेला ८ इलेक्ट्रॉनिक अँटोमँटिक पंप भेट; वाढते रुग्ण व वाढते कंटेनमेंट झोन पाहता अत्याधुनीक इलेक्ट्रॉनिक पंपाने होणार फवारणी:- विवेक परदेशी,आरोग्य समिती सभापती



इलेक्ट्रॉनिक अँटोमॅटिक पंपाच्या मदतीने होणार जलद फवारणी

पंढरपूर // प्रतिनिधी 
नगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करत असताना, ठरलेल्या पद्धतीने काम करण्या पेक्षा विचार विनिमयाने नवनवीन पध्दती शोधुन त्या आमलात आणुन कमी कष्टात जलद रितीने काम कसे करता येईल याचा आरोग्य विभाग सतत अभ्यास करत असल्याचे सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले. आमचे सफाई कर्मचारी ,नागरी हिवताप विभागातील कर्मचारी हे कंटेनमेंट झोन मध्ये, पॉझिटिव्ह नागरिकांच्या घराकडील परिसरात, कोव्हिड केयर सेंटर मध्ये सफाई, फवारणी करत असतात. त्याच्या या कामामध्ये अत्याधुनीक मशीन वापरल्यास जलद गतीने काम होईल व काम करण्यातील धोका कमी होईल. नगरपालिकेला सभापती विवेक परदेशी यांच्या वतीने अत्याधुनिक आटोमॅटिक  इलेक्ट्रॉनिक हँडपंप आठ नग देण्यात आले. यामुळे वाढत्या कंटेनमेंट झोन मध्ये कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त भागाचे निर्जंतुकीकरण करणे सोपे झाले आहे. .कोरोनाच्या संकटामध्ये अनेक प्रकारची कामे,अत्यावश्यक खर्च, मेडीकल यंत्रे ध्यावी लागणार आहे. सध्याचे वाढते कंटेनमेंट झोन व त्यासाठी नगरपालिकेला आत्यावश्यक सेवेस खर्च करण्यासाठी निधी शेवटपर्यंत पुरावा  व तातडीने पंप उपलब्ध व्हावेत यासाठी सदर पंपं उपलब्ध करुन दिले असल्याचे सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले. 
कोव्हीड केयर सेंटर आणी उपजिल्हा रुग्णालया मध्ये अनेक नागरिकांना उपचार देण्यात येत आहे, कोरोना बाधीत व इतर आजाराच्या पेशंटची संख्या वाढतच चालली आहे, दुर्भाग्याने कोमॉरबीड, कोरोना बाधीत व इतर नगरिकांचे मुत्युही होत आहेत व  बरेच नागरिक कोरोनामुक्त होउन त्यांना घरी सोडण्यात येत आहेत. मुत्यु दर कमी करण्याचा प्रशासन, आरोग्य विभाग खुप प्रयत्न करत आहे. सदर उपचार होत असताना विविध अत्याधुनीक यंत्र, मशीन उपलब्ध झाल्यास अनेक नागरिकांना याचा उपयोग होईल. यासाठी प्रशासन , नगरपरिषद प्रयत्न करत आहे. पंढरपूरतील सामाजिक संस्था, विठ्ठल रुक्मिणी मंदीर समीती, सर्व सेवाभावी व खाजगी संस्था, सामान्य नागरिक , दानशुर व्यक्ती यांनी आपल्या ताकदी प्रमाणे आत्यावश्यक वस्तु , मशीनरी उपलब्ध करुन दिल्यास असंख्य नागरिकांना  तातडीने याचा उपयोग होइल. प्रशासनाला,आरोग्य विभाग, डॉक्टर, नर्स यांना सेवा करताना, जबाबदारी निभावताना मोलाची मदत होईल व बरेच नागरिकांचे जिव वाचतील, त्यासाठी इच्छुकांनी प्रशासनाशी आणी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे अवाहन आरोग्य सभापती परदेशी यांनी केले  आहे. आपल्या मदतीचा निश्चीतच असंख्य नागरिकांचा उपयोग होईल.
सदर प्रसंगी नगराध्यक्षा साधनाताई भोसले, उपनगराध्यक्षा अनिल अभंगराव, नरेंद्र डांगे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, हिवताप अधिकारी किरण मंजुळ, संजय देशमुख,नामदेव सर्वगोड, उमाकांत सगरे आदी उपस्थित होते.

विवेक परदेशी 
आरोग्य समिती सभापती

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget