जनकल्याण हॉस्पिटलमधून पहिला रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतला.




पंढरपूर // प्रतिनिधी 
वाखरी येथील एमआयटी कोविड केअर सेंटरमधून पहिला पेशंट जनकल्याण हॉस्पिटलमध्ये आला. आज तोच रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतला. त्यावेळी रुग्णावर पुष्पवृष्टी करण्यात आली. हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर स्टाफ हे अत्यंत काळजीपुर्वक रुग्णांवर उपचार करत आहेत. त्याबरोबर त्यांना काढाही दिला जात आहे आणि रग्ण जनकल्याण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. 

यावेळी उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ.सागर कवडे,जनकल्याण हॉस्पिटलचे मार्गदर्शक तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, तहसिलदार वौशाली वाघमारे,नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वौद्यकीय आधिक्षक डॉ.सौ.जयश्री ढवळे,तालुका वौद्यकीय आधिकारी डॉ.एकनाथ बोधले,नायब तहसिलदार विजय जमादार,जनकल्याण हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ.अजित जाधव,वसंतदादा मेडीकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.सुधीर शिनगारे,डॉ.अनिल काळे,डॉ.रणदिवे,डॉ.महेश लिंगे,डॉ.प्रदीप डोके,डॉ.अंजली थोरात,डॉ.घोगले,म्ॉनेजर सद्दाम मणेरी,सत्यवान बागल,आण्णा डुबल,व सर्व स्टाफ उपस्थित होते. सर्वांनी मिळणू चांगल्या प्रकारची सेवा केली.

पंढरपूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जनकल्याण हॉस्पिटल हे प्रशासनाने ताब्यात घेतले होते. या प्रक्रियांमध्ये हॉस्पिटलनेही आपले हॉस्पिटल कोविड केअर सेंटर म्हणून करण्यासाठी संमती दिली होती. याकामी उपविभागीय आधिकारी सचिन ढोले यांचे मार्गदर्शन लाभले आणि तेव्हापासून या जनकल्याण हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार होऊ लागलेले आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget