पोलिस वसाहतीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविणार:गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई

 

  पंढरपूर प्रतिनिधी:- पंढरपूर येथील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वसाहतीच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात वरिष्ठ अधिका-यांसोबत तातडीने बैठक घेऊन हा प्रश्न कायम स्वरूपी सोडवला जाईल,असे आश्वासन राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज दिले. 

शिवसेना पंढरपूर विभाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी पोलिस वसाहतीच्या संदर्भात मागणीचे निवेदन  गृहमंत्री शंभूराजे देसाई यांना देण्यात आले आहे. 
यावेळी मंत्री देसाई यांनी पोलिस कर्मचारी वसाहतीच्या प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. 
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पोलिसांची संख्या आहे पंढरपूर येथे पोलिस कर्मचा-यांची जुनी वसाहत आहे. 
सध्या वसाहतीमधील घरे जीर्ण झाली आहेत येथे नवीन वसाहत उभारण्यात यावे  या संदर्भात प्रस्ताव तयार करून तो पाठवला आहे. परंतु तो अद्याप मंजुर झालेला नाही  पोलिस वसाहतीचा  प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत संभाजी शिंदे यांनी गृहमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी चर्चा केली या शिवाय पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे पोलिस औट पोस्ट सुरू करण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली. याबाबत तातडीने माहिती घेऊन यावरही कारवाई केली जाईल असे गृहमंत्री देसाई यांनी सांगितले.

याप्रसंगी आ.शहाजीबापु पाटील,शिवसेनेचे पंढरपूर शहर प्रमुख रवि मुळे, युवा सेना शहर समन्वयक अमित गायकवाड, युवा सेना तालूका उपप्रमुख रणजित कदम व आदी मान्यवर  उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget