डाॅ.यशवंतराव कुलकर्णी यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव



आरोग्य तपासणी शिबिर, ऑनलाईन रांगोळी स्पर्धा,सामान्य ज्ञान स्पर्धेचे  यावेळी आयोजन.


सोलापूर // प्रतिनिधी

श्रीपुर(ता.माळशिरस) श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या परिसरातील नागरिक, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी कुलकर्णी यांच्यावरती वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला.

आरपीआय युवक आघाडी श्रीपुर, जिगरबाज ग्रुप व राजरत्न नाईकनवरे मित्र मंडळ यांच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक  यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांनी यांनी देखील कुलकर्णी यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला. रोटरी क्लब श्रीपुर यांच्याकडून ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचा शुभारंभ कुलकर्णी यांच्या शुभहस्ते लिंक फॉरवर्ड करून करण्यात आला. यावेळी गस्तपथक या साप्ताहिकाच्या अंकाचे प्रकाशन चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आज दिवसभर फिजिकल डिस्टन्सचे पालन करत वेगवेगळ्या परिसरातील, स्थानिक नागरिकांनी  सोशल मीडिया वरती शुभेच्छा संदेश  देऊन, स्वतः जाऊन कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या.  श्रीपुर मध्ये आल्यापासून कुलकर्णी यांनी कारखान्याची महाराष्ट्रभर आणि देशभर एक वेगळी ओळख करून दिली आहे. त्यांचा प्रत्येक क्षेत्रात खूप मोठा जनसंपर्क आहे. प्रभावी, भारदस्त, शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व म्हणून कुलकर्णी यांची परिसरामध्ये ओळख आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कामासाठी कुलकर्णी यांचे परिसरामध्ये मोठे सहकार्य असते. प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये कुलकर्णी साहेबांबद्दल एक वेगळे आपुलकी, प्रेम, माया आहे. त्यामुळेच आज दिवसभर त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रांग लावली होती. या सर्वांचे कुलकर्णी यांनी मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget