राज्यात 3 आणि 4 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस



वृत्तसंस्था // प्रतिनिधी

उत्तर-मध्यमहाराष्ट्रापासून ते कर्नाटकच्या  किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या स्थितीमुळे मध्यमहाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे (घाटमाथा) कोकणात पालघर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, उत्तर-मध्यमहाराष्ट्रातील  धुळे, जळगाव, नाशिक, नगर  या भागांत मुसळधार; मराठवाड्यात लातूर आणि उस्मानाबाद भागात मध्यम, तर उर्वरित भागात हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.     

गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्र,  गुजरात आणि मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड या भागांत गेल्या काही दिवसांपासून चक्रीय स्थिती असून, त्याचा  प्रभाव कायम आहे. या स्थितीमुळे 3 आणि 4 जुलै असे सलग दोन दिवस चांगला पाऊस राहणार आहे.

गेल्या चोवीस तासांत राज्यातील प्रमुख शहरांचा पाऊस मी. मी. मध्ये पुढीलप्रमाणे :- रामेश्वणर कृषी-70, देवगड, मालवण-60, राजापूर, सांवतवाडी-50, शिरूर -120, महाबळेश्व र- 40, जेजुरी-30, परभणी-110, पूर्णा-80, धर्माबाद-70, उमरी-60, नांदगाव काजी-90, दर्यापूर-60, नागपूर- 50

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget