वृत्तसंस्था // प्रतिनिधी
नागपंचमी उत्सवाची शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कोरोना व्हायरसच्या पाश्र्वभूमीवर खंडीत झाल्याने शिराळासह संपूर्ण तालुक्यात नाराजी पसरली आहे. शिराळा गावातील ग्राम दैवत आंबामाता मंदिर दर्शनसाठी बंद करण्यात आले आहे. मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शिराळा तहसीलदार कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत नागपंचमी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय झाला आहे. फक्त शेकडो वर्षे परंपरा असलेल्या मानाच्या प्रमोद महाजन यांच्या पालखीस परवानगी दिली आहे.
दहा लोकांनी मानाची पालखी भूई, कोतवाल यांनी महाजण यांच्या घरातून पालखीतून नाग मूर्ती घेऊन कुरणे गल्ली, सोमवार पेठ, आंबामाता रोड वरून मंदिरात नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पूजा अर्चा होणार आहे. गावातील साठ नागराज मंडळांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी देण्यात आली नाही.
महाराष्ट्र राज्य तून दरवर्षी हजारो भाविक आंबामाता मंदिरात दर्शनासाठी येतात त्यांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली नाही. वनखात्यांनी गेल्या एक महिन्यापासून नाग पकडू नये यासाठी प्रबोधन केले आहे. तसेच वनखात्यांची गस्ती पथके फिरत आहेत. सन २००२पासून न्यायालयाने घरोघरी करण्यात येणारी जिवंत नाग पूजा बंद केली आहे. गावातील महिलांना प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागपंचमी उत्सव साजरा करावा लागतो.
नागपंचमी न्यायालयाने घालून दिलेल्या बंधनाप्रमाणे दरवर्षी साजरी करण्यात येत आहे. या वर्षी मात्र कोरोना व्हायरसचा विळखा संपूर्ण तालुक्याला पडला आहे. शासनाने सर्व उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिराळा आगाराच्या बस गाड्या डेपोमध्येच लावून आहेत. नागपंचमी उत्सवासाठी दरवर्षी आगारातील व बाहेरून आलेल्या एसटी बस संख्या मोठी असते.
जनता कर्फ्यू लागल्याने सर्व व्यवहार बंद आहेत. तसेच प्रशासनाने जनता कर्फ्यूची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. नगराध्यक्षा सौ. अर्चना शेटे, मुख्याधिकारी योगेश पाटील, उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, बांधकाम सभापती सौ. सुनिता निकम, सर्व नगरसेवक यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.