पंढरपूर // प्रतिनिधी
आज पंढरपूर शहरातील मध्यवर्ती व्यापारी कमिटीने पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब यांना निवेदन देऊन या निवेदनात मागणी केली आहे की सर्व पंढरपूर शहरामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही ही सर्व दुकाने चालु ठेवू इच्छित आहे कोरोनाव्हायरस चा वाढता प्रादुर्भाव पाहता पंढरपूर व्यापार कमिटीने स्वतःहून स्वतःचा मोठेपणा दाखवत हे निवेदन सादर केले आहे; हे या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की; पंढरपूर शहरातील व्यापारी दुकाने ही सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत पूर्वीप्रमाणे उघडी असावीत कारण की या दुकानांमध्ये कामगारांना सलग दहा तास काम करावे लागते ते काम जादा होत आहे तरी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने उघडी ठेवावीत अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे यावेळी व्यापार कमिटीचे अध्यक्ष पद्म कुमार प्रकाश चंद गांधी, उपाध्यक्ष विजयकुमार रामचंद्र परदेशी, तसेच चेअरमन धीरज कुमार म्हमाणे यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.