सोलापूर // प्रतिनिधी
विश्व क्रांती सामाजिक माल वाहतुक संघटना यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 12 जुलै 2020 रोजी पंढरपूर येथील सरगम चौकातील सी.पी बागल यांच्या ऑफिस शेजारी करण्यात आले आहे.
यावेळी सर्व रक्तदात्यास संघटनेच्यावतीने 18 लिटर पाण्याचे जार भेट देण्यात येणार आहे विश्व क्रांती सामाजिक संघटना ही आजपर्यंत अनेक नवनवीन उपक्रम हाती घेतले असून या संघटनेने बरेच वेळा रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन केले आहेत विश्व क्रांतीसामाजिक संघटनेचे काम हे उल्लेखनीय असून याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हे रक्तदान शिबिर संस्थापक अध्यक्ष दिलीप मलपे. उपाध्यक्ष संदीप शिंदे तसेच संस्थापक सचिव भाऊराव जाधव, जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे,व जिल्हा उपाध्यक्ष सुरज चौधरी यांच्याकडून आयोजित करण्यात आले आहे तरी या रक्तदान शिबिरास सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे व आपले रक्त देऊन आपली सामाजिक बांधीलकी जपावी असे आवाहन संस्थापक उपाध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी यावेळी केले......

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.