वृत्तसंस्था // प्रतिनिधी
चीनविरोधात भारताने मोर्चेबांधणी वेगवान केलेली असताना आता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील अॅक्टिव्ह झाले आहेत. सरकारने अॅप बॅन केलेले असताना आता गडकरींनी हायवे प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांची एन्ट्री बंद करण्याची मोठी घोषणा केली आहे.
नितीन गडकरी यांनी बुधवारी सांगितले की, जर चीनच्या कोणत्याही कंपनीने भागीदारी करत अन्य कोणत्याही कंपनीद्वारे हायवे प्रकल्प लाटायचा प्रयत्न केल्यास त्यांना रोखले जाणार आहे. याशिवाय सरकारही MSME सेक्टरमध्ये चिनी कंपन्यांना सहभागी होऊ न देण्यासाठी पडताळणी करणार आहे.
केंद्र सरकार लवकरच चीनविरोधी पॉलिसी आणणार असून त्या द्वारे चिनी कंपन्यांची भारतीय प्रकल्पांमध्ये एन्ट्री बंद होईल. भारतीय कंपन्यांसाठी नियम सोपे केले जाणारा आहेत. कोणत्याही प्रकल्पात भारतीय कंपन्यांना अधिकाधिक संधी कशी मिळेल याचाही या पॉलिसीमध्ये विचार केला जाणार असल्याचे गडकरी म्हणाले.
तर निविदा रद्द होईल
हायवे प्रकल्पांमध्ये सध्याच्या घडीला काही असे प्रकल्प आहेत, ज्यामध्य़े चीनची गुंतवणूक आहे. मात्र, चालू स्थितीमध्ये जर कोणत्या टेंडरमध्ये जर कोणत्याही चायनिज व्हेंचरसोबत मिळून भारतीय कंपनीने निविदा भरलेली असल्यास किंवा त्यांना ते मिळाल्यास प्रक्रियाच रद्द करून पुन्हा नव्याने राबविण्यात येणार असल्याचा इशारा गडकरी यांनी दिला. हा नियम सध्या आलेल्या किंवा भविष्यातील निविदा प्रक्रियांसाठी लागू असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.