पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने कोरोना महायोध्दा म्हणून शिवाजी केंगार यांचा सन्मान



सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

सा.मंगळवेढा वेधचे संपादक व दैनिक पंतनगरीचे कार्य.संपादक शिवाजी केंगार यांचा पत्रकार सुरक्षा समिती,महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने कोरोना महायोध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.या सन्मानाचे वितरण प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राज्य सचिव डॉ.अशिषकुमार सुना, बाबासाहेब काशिद,प्रकाश पारसे,चंद्रकांत केंगार,विशाल गेजगे आदी उपस्थित होते.
संपूर्ण जग आज कोरोना विषाणूशी लढा देत आहे,अशा कठिण प्रसंगी आपले कुटूंब आपल्या वैयक्तिक इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून व आपल्या जीव धोक्यात घालून केवळ सामान्य नागरीकांच्या सुरक्षतेसाठी आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे बजावत आहेत. पत्रकार शिवाजी केंगार यांनी सामाजिक कार्यासोबत गोर गरीब लोकांना मदतीचा हात दिला आहे, त्यांनी लॉकडाऊनमध्ये 7 पोती ज्वारी, सामान्य कुटूंबांना किराणा साहित्यासाठी आर्थिक मदत, काही गरजू पत्रकारांना किराणा साहित्याचे किट वाटप करून सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य निष्ठतेसाठी कोरोनाच्या लढाईत पत्रकार म्हणून बहुमोल योगदान दिले आहे. 
यामुळे संपूर्ण मंगळवेढा तालुक्यातून प्रशासनासही मिळणार्‍या सहकार्याची दखल घेवून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून कोरोना महायोध्दा म्हणून शिवाजी केंगार यांना गौरविण्यात येत असल्याचे सन्मानपत्रात नमूद केले आहे.
शिवाजी केंगार हे सा.मंगळवेढा वेध, दै.पंतनगरी न्यूज या वृत्तपत्राच्या माध्यमातून तसेच मरवडे गावचे विद्यमान तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणून गेल्या चार महिन्यापासून जागृतपणे केलेल कार्य कौतुकास्पद आहे, त्यांनी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचा माजी अध्यक्ष, होलार समाजाचे तालुकाा अध्यक्ष,पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे समाजहिताचे कार्य दखलपात्र असल्याचे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी बोलताना व्यक्त केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget