सिव्हिलमध्ये १२० बेडच्या कोरोना वॉर्डाचे पालकमंत्र्यांनी केले उदघाटन



सोलापूर // प्रतिनिधी 
येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील बी ब्लॉक येथे कोरोना रुग्णांसाठी नव्याने तयार करण्यात आलेले १२० बेडचे सर्व सोयीयुक्त विभागाचे उद्घाटन आज रविवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, अधिष्ठाता संजीव ठाकूर आदी उपस्थित होते. 
अगदी कमी वेळात सदर ठिकाणी अत्याधुनिक असे उपचार यंत्रणा उभी करण्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तसेच प्रशासनाचे अधिकारी यांच्या मोलाच्या सहकार्याने ही जबाबदारी पार पाडली. सध्याच्या करोनाच्या महामारीच्या काळात सोलापुरात वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याकरिता शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचाराची गरज ओळखून जास्तीचे बेड उपलब्ध करून देण्यात आले असून लवकरच अधिकचे २० आयसीयू बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी सांगितले. उद्घाटन केलेल्या ठिकाणची चोख व्यवस्था पाहून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget