वृत्तसंस्था // प्रतिनिधी
आज बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख जिल्हाध्यक्ष सातारा यांच्यावतीने मा शरद चंद्रजी पवार साहेब यांना गाईच्या दुधाला 3-5 8-5 ला 30 रुपये दर व दुधाला 10 रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणे बाबत व थकित एफ आर पी शेतकऱ्यांना तात्काळ मिळणेबाबत निवेदन देण्यात आले
कोरोणाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली शेतमालाला भाव नाही शेतमाल रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आहे त्यामुळे शेतकरी आणखीन अडचणीत सापडला आहे अशातच महावितरण अन्याय कारक व बेकायदेशीर वीजबिले वाढवून दिली आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे शेतकऱ्यांना निवडणूक काळात जाहीर केल्याप्रमाणे कर्जमाफी मिळावी व संपूर्ण घरगुती विज बिल माफी मिळावी
शेतकऱ्यांचा घर खर्च दुधावर चालतो परंतु लाकडाऊनच्या काळात दुधाचे दर मोठ्या प्रमाणात ढासळले आहेत गाळप हंगाम संपून दुसऱ्या गळीत हंगामाची तयारी साखर कारखान्यांनी चालू केली आहे परंतु अद्यापही काही कारखान्यांनी एफ आर पी पूर्ण दिलेली नाही तरी तात्काळ राहिलेली एफ आर पी शेतकऱ्यांना मिळावी
खाद्याचे दर भरमसाठ वाढले आहेत परंतु दुधाचे दर ढासळले आहेत बिसलरी बाटली वीस रुपये व दुधाचा दर 18 रुपये त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे तरी गाईच्या दुधाला 3-5 8-5 ला 30 रुपये दर मिळावा व दहा रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करावे याची अंमलबजावणी तात्काळ करावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना शेतकर्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र भर आंदोलन करेल निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख साजिद मुल्ला व कामगार नेते घराळ बापू व शेतकरी उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.