पंढरपूर // प्रतिनिधी
कोविड-19च्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या या संकट काळात कंत्राटी पद्धतीने काम करून स्वतःचा जिव जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करणा-या कोरोना योद्धांना भविष्यातील शासनाच्या नोकरभरतीत आरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे.अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. सध्या कोविड-१९च्या पाश्रर्वभुमीवर सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. राज्यभरात दिवसेंदिवस कोरोना विषाणूनची बाधा झालेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासन मोठ्या निधी यंत्रसामुग्री,सुविधा उपलब्ध करून देत आहे.मात्र वाढत असलेल्या रूग्णसंख्येला मनुषबळ व तज्यांची कमतरता पडत आहे.त्यामुळे सरकारने डाॅक्टर,नर्सस वाडबाय,स्वच्छाता कर्मचारी आदींची कंत्राटी पद्धतीने मर्यादीत काळासाठी नोकरभरती केलेली आहे.सदर सर्व कोरोना योद्धे या संकटकाळत जनतेला सेवा देताना सामाजिक जावणीवेचे भान ठेवून काम करत आहेत.कोरोनाचा संसर्ग होवू नये यासह कोडिव रूग्णांना उपचार देण्यासाठी स्वतःचा जीवन धोक्यात घालून काम करत आहेत.कंत्राटी पद्धतीने भरती केलेल्या डाॅक्टर,नर्सेस वार्डबाॅस, सफाई कामगार यांना भविष्यात नोकरभरती अतिरिक्त गुणांसह आरक्षण द्यावे.आणि त्यांच्या हिताचा विचार होण्याची गरज असल्याचे शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी म्हटले आहे. त्यासाठी त्यांना शासनाच्या भविष्यकलीन नोकरभरतीसाठी आरक्षण घ्यावे.लेखी आणि तोंडी परिक्षेत दहा अतिरिक्त गुण देण्याची तरतुद महाराष्ट्र शासनाने करण्याची मागणीही संदिप मुटकुळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे यांच्याकडे निवेदनाव्दारे आणि मेलव्दारे केली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.