पंढरपूर // प्रतिनिधी
छञपती संभाजी महाराज यांच्या नावाने सुरू असणारी बिडी बंद करा . ज्या छञपती संभाजी महाराज यांना सुपारीचे खांडाचे पण व्यसन नाही त्या छञपती संभाजी महाराज यांच्या नावाने बिडी विकून छञपती संभाजी महाराज यांचे चरिञ हनन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.चाळीस दिवस विटंबना सहन करून धर्मासाठी व हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणार्या शिवपुञ शंभूराजेंची बदनामी होत असताना आम्हाला काहिच वाटत नाही.आम्ही शंड होऊन घरामध्ये बसलो आहे आणि उघड्या डोळ्यांनी शिवपुञ छञपती संभाजी महाराज यांची बदनामी पाहत आहोत.
छञपती शिवराय व छञपती संभाजी महाराज यांनी आपले भविष्य जाणले आहे आपण त्यांचा इतिहास तरी जपून या आपल्या सर्वांना शिवप्रभू छञपती शिवाजी महाराज व शिवपुञ छञपती संभाजी महाराज यांची आण आहे तुमच्यामध्ये थोडा जरी स्वाभिमान असेल तर येणार्या एक सप्टेंबर च्या लढ्यात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा.महाराष्ट्रातील तमाम शिवशंभू भक्तांनी होईल तितका निषेध करा आपल्या आसपास ही बिडी दिसत असेल तर तिची तिथेच होळी पेटवा.आत्ता नाही तर कधीच नाही.उठ तरूणा जागा हो संभाजी बिडी आंदोलनाचा धागा हो. असे आव्हान शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक खजिनदार अभिजीत चवरे यांनी केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.