मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे विठ्ठलचे संचालक मा.श्री.भगिरथ( दादा)भालके यांच्या हस्ते स्वरूपा फाउंडेशनचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री सौ. दया बलवान वाकडे ह्या होत्या. लेखिका कु निकीता दादासाहेब पाटील यांनी त्यांच्या प्रास्ताविकातून या फौंडेशनचा उद्देश सांगत समाजाप्रती सामाजिक बांधिलकी ही विशद केली. पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचे वाटप महिला बचत गटांना यावेळी करण्यात आले. निकिताताई स्व:निर्मित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवलेल्या होत्या त्यामुळे सर्व उपस्थित मान्यवरांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना भगीरथ (दादा) भालके म्हणाले की पाटील कुटुंब सातत्यानं लोकउपयोगी व समाजोपयोगी कामे करत असतात. या फाउंडेशनच्या माध्यमातून या कार्यास अजून नक्की वेग येईल .व माध्यमातून विविध उपक्रम राबविले जावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ. दया वाकडे यांनी स्वरूपा फाउंडेशनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आई वडिलांच्या स्मृतींचा ठेवा जपण्यासाठी
सुरु केलेले फाऊंडेशन अनोखे असल्याचे सांगत. कै . स्वरूपा पाटील व कै. डॉ. दादासाहेब पाटील यांच्या सामाजीक वारसा निकिता ताई या फाउंडेशनच्या माध्यमातून नक्की जपतील याची खात्री वाटते असे सांगत उपस्थिती उपस्थितांना या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केलेा. मा. श्री काकासाहेब डोंगरे मा.श्री काशिनाथ पाटील व गावातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने या उद्घाटन समारंभास उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार श्री उत्तरेश्वर स्वामी यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु स्नेहल अंबादास सोलनकर यांनी केले . कार्यक्रमास विविध महिला बचत गटाच्या अध्यक्षा , सचिव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पाटील कुटुंबीय व मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.