प्रणव परिचारक यांची सर्व पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यां साठी भावनीक पोस्ट


आपल्या सर्वांचे नेते आधारवड दिवंगत श्रीमंत... "सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक)"...

यांना देवाज्ञा झाली आणि प्रत्येकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. गेल्या दोन दिवसात पंढरपूर, मंगळवेढा, श्रीपूर यासह संपूर्ण जिल्हयात दुःखाची छाया आहे. यामध्ये आरोग्याच्या कारणास्तव कोविड संदर्भातील शासकीय नियमांमुळे प्रशांत मालक, उमेश मालक यांना आणि मी पण सेल्फ कोरंटाईन असल्यामुळे आम्हास जनतेमध्ये थेट सहभागी होता आले नाही. सध्या आम्हा सर्व कुटुंबियांची प्रकृती स्थिर आहे. पण "मोठे मालक" यापुढे वाड्याच्या ओसरीवर नसणार या दुःखांचे ओझे आम्हा कुटुंबियांच्या मनावर असणार आहे. गेल्या दोन दिवसात प्राचार्य मिलिंद काकांच्या खांद्यावर... "मोठ्या मालकांच्या" सर्व स्नेहीपरिवाराला सांभाळण्याची धुरा होती. प्रत्येक कार्यकर्त्याला भेटत असताना मिलिंद काका मोठ्या मालकांनी घालून दिलेले आदर्श , सन्मार्ग , निस्पृह सेवा याचे आपण सर्वांनी यापुढे सदोदीत आचरण करायचे आहे. मालकांचा आदर्श जन्मभर विसरायचा नाही.  असेच सांगत होते. अशातही कार्यकर्त्यांनी "मोठया मालकांच्या" आदर्श शिकवणीचा पुरस्कार करून स्वतःला सावरले. प्राचार्य मिलिंद काकांच्या सोबत राहून सर्वानी मोठ्या मालकांच्या अस्थींचे पवित्र चंद्रभागेत बुधवारी विसर्जन केले त्यांच्या अस्थिकलशाची विधीवत पूजा केली. आणि त्यांना निरोप दिला. 


आयुष्यभर ज्या व्यक्तींने लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी काम केले. त्यांना शेवटचा निरोप आपणा सर्व स्नेह परिवाराला देता आला नाही. याचे शल्य कायमच मनात राहील. 

मी गेलो ऐसें मानू नका...

भक्तीत अंतर करु नका...

कदा मजलागीं विसरू नका...

मी आहे येथेच....

या "*संतकवी दासगणू महाराजांच्या"...ओळींप्रमाणे...

आदरणीय "मोठया मालकांची"... ‘लोकांसाठी काम करीत रहा , आणि पुढे चालत रहा...’ ही शिकवण आता आपण प्रत्येकाने अंगीकारली पाहीजे. यापुढे आदरणीय मालकांनी "जनसेवेचा" दिलेला संस्कार आपणा सर्वांच्या सहकार्याने... सर्वांसोबत... तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून अधिक वृध्दींगत करायचा आहे. या प्रेरणादायी वृत्तीतूनच "मोठया मालकांची" आशीर्वादरूपी छाया सतत कृपाछत्राप्रमाणे तुम्हा-आम्हांवर राहील. यासाठी पंढरपूर तालुका, पांडुरंग परिवार, मोठया मालकांचे अगणित स्नेही.... हितचिंतक यांनी यापुढेही "मोठ्या मालकांच्या" विचाराची, संस्काराची कास धरून पांडुरंगाच्या कृपेने काम केले पाहीजे. या दुःखातून सावरून उभारी घेणे ... हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. यासाठी *संपूर्ण परिचारक कुटुंबिय यापुढेही ..."स्वर्गीय मोठ्या मालकांचा" लोकसेवेचा अन त्यांनी केलेले संस्कार निरंतर जपण्याचा सदैव प्रयत्न करेल...!


आपलाच 

प्रणव परिचारक व परिचारक कुटुंबीय

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget