फॅबटेक टेक्निकल कॅम्पस व यशस्वी ग्रुप पुणे यांच्यातर्फे ऑनलाईन पूल कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन



वृत्तसंस्था // प्रतिनिधी  

फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च,सांगोला व यशस्वी ग्रुप पुणे यांच्यातर्फे ऑनलाईन पूल कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री.भाऊसाहेब रूपनर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याची माहिती कॅम्पस  डायरेक्टर श्री. संजय अदाटे  यांनी दिली. 

या ऑनलाईन पूल कॅम्पस ड्राइव्हमध्ये बीई, डिप्लोमा,आयटीआय इत्यादी ट्रेडच्या विद्यार्थ्यांना यामध्ये आपले नाव ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून नोंदविता  येणार आहे. या ऑनलाईन कॅम्पस ड्राइव्हमध्ये १६ हुन जास्त कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये तब्बल ८४० जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी  https://forms.gle/ahNbDxmCFHXggcKF8  या लिंकवरती दिनांक २२ ऑगस्ट २०२० पर्यंत करावी. अशी माहिती ट्रैनिंग  प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा यांनी दिली आहे

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget