वृत्तसंस्था (प्रतिनिधी):-देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आता महाराष्ट्रात कोरोना चाचणीसाठी अँटिजेन आणि अँन्टीबॉडी टेस्टनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आता आवाजावरून कोविड टेस्ट करणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुऱेश काकाणी यांनी दिली आहे.
या नव्या प्रयोगात ध्वनी लहरींवरुन कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचे निदान केले जाऊ शकते.
गोरेगावच्या नेस्को सेंन्टरमध्ये कोविड संशयित असणाऱ्या 1000 रूग्णांवर सध्या एआय-आधारित व्हॉईस सॅम्पलिंगचा वापर करून चाचणी करण्यात येणार आहे. ध्वनी लहरींच्या या चाचणीमुळे केवळ 30 मिनिटात कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही याचे निदान स्पष्ट होणार आहे. या चाचणीत जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे आरटीपीसआर चाचणीने निदान पक्के केलं जाणार आहे.
फ्रान्स आणि इटलीसह काही युरोपियन देशांमध्ये कोविड 19ची चाचणी करण्यासाठी कोरोना संशियताच्या आवाजाचा वापर केला गेला आहे. ज्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसतात तेव्हा त्यांना श्वासाचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो.
या सर्व प्रक्रियेत फुफ्फुसांच्या स्नायूंवर ही परिणाम होऊन त्यांना सूज येते. त्यामुळे आवाजावर परिणाम होतो. आवाजावर परिणाम झाल्यामुळे त्यात बदल होतो आणि याच बदललेल्या आवाजाला मोजण्यात येते आणि त्यातून त्या व्यक्तिला कोरोना झाला आहे का नाही हे स्पष्ट होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘बीएमसी आता आवाजावरून कोविड टेस्ट करणार आहे. एआय-आधारित व्हॉईस सॅम्पलिंगचा वापर करण्यात येणार आहे. आरटी पीसीआर चाचण्या होत राहतील."

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.