सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपूर शहर व परिसरात सात दिवसाचा लागू करण्यात आलेला लॉकडाऊन पुन्हा एक दिवसाने वाढविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली़ आता १४ आॅगस्टच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार असल्याचेही ढोले यांनी सांगितले.
पंढरपूर शहर आणि परिसरातील कोरोना बाधितांची साखळी तोडण्यासाठी पंढरपूरमध्ये ७ ते १३ आॅगस्टपर्यंत सात दिवसाचा लॉकडाऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केला होता, गरज पडल्यास हा कालावधी पुढे तीन दिवस वाढविणार असल्याचेही सांगितले होते.
सात आॅगस्टपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची नियम आता १४ आॅगस्टपर्यंत असणार आहेत़ सकाळी सात ते नऊ दुध विक्री, मेडिकल आणि दवाखाने या अत्यावश्यक सेवा नियमित वेळेत सुरू राहणार आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.