पंतप्रधान मोदींनी 'पारदर्शक कराधान मंच'ची केली सुरुवात.


यामध्ये फेसलेस अॅसेसमेंट, अपील आणि टॅक्सपेअर चार्टरसारखे मोठे रिफॉर्म समाविष्ट.


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील प्रामाणिक करदात्यांसाठी नवीन प्लॅटफॉर्म ' पारदर्शक कराधान मंच' लाँच केले. यामध्ये फेसलेस अॅसेसमेंट, अपील आणि टॅक्सपेअर चार्टर सारख्या मोठा रिफॉर्म आहेत. फेसलेस अॅसेसमेंट आणि टॅक्सपेअर चार्टर आजपासून लागू झाले आहेत. फेसलेस अपील 25 सप्टेंबर दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीपासून देशभरात लागू होईल.


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मागील बजेटमध्ये टॅक्सपेअर चार्टर आणण्याची घोषणा केली होती. मागील आठवड्यात देखील त्यांनी या चार्टरला लवकरच लागू करण्याचे संकेत दिले होते. मंत्रालयाने सांगितले की आयकर विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी सीबीडीटीने अनेक पावले उचलली आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget