तो एक... राजहंस..!"

 


गेल्या महिन्यातच गाठ पडल्यावर आवर्जून...

"ते ... नाकाला बांधायचं कुठाय..?

गळ्यात अडकवू नका नुसतं...

बांधा ते... अन उन्हाचं फिरू नका...

ते तुमचे.. भाषण शिकवायचे क्लास या कोरोनाने बंदच असतील... सगळं नीट झाल्यावर सुरू करा परत...

बाकी... घरचे सगळे बरेयत ना..?..." -- असं हक्कानं सांगत... विचारत.... स्वावलंबीपणानं गाडीत बसून... हात जोडून मोठे मालक निघून गेले...! 

मोठे मालक वंदनीय सुधाकरपंत परीचारकांची ही "शेवटची" भेट ठरेल... असं स्वप्नातही वाटलं नाही..! हा अनुभव माझ्यासारख्या प्रत्येक सर्वसामान्याला सतत येत राहीला.

हे मोठ्या मालकांचं "काळजीवाहू आपलेपण" ... प्रचंड गर्दीतही... 

त्यांची "आपला माणूस" ही ओळख टिकवायला कारणीभूत आहे...!

लिहितच राहिलं तर छोट्या-मोठ्या जपलेल्या असंख्य आठवणी सध्या पाण्याचा लोंढा फुटतात तशा मनात गर्दी करतायत. सर्वसामान्य नागरिक म्हणून समाजात वावरताना ... स्वच्छता.. टापटीप...स्वावलंबन... वेळेची मर्यादा अन बंधन... समयसूचकता... समोरच्या प्रत्येक व्यक्तीबद्दल जिव्हाळा...या साध्या गोष्टींचा "मोठ्या मालकांचा"... आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ... स्वच्छ प्रतिमेनं ... सर्वांमध्ये "कुटुंबातील एक" होऊन जगणं हीच त्यांना खरी "आदरांजली" होईल...!

"आता मला कापरे भरत नाही....

कारण ....

माझ्यातला "सागर"... 

सतत "गर्जना" करीतच असतो...

"भरती" आणि "ओहोटी" यांनी... 

तो विचलित होत नाही...

कारण "भरती" ही जर माझी कृती आहे....

तर "ओहोटी" ही विकृती कशी म्हणता येईल ?

भरतीच्या लाटांनी...

मी जीवनाला "आलिंगन" देतो...

आणि ओहोटीच्या हातांनी.... 

त्याचा "पदस्पर्श" करतो....

आणि 

निबिडातल्या *"एकान्त साधनेत"*... 

पूर्ववत् गढून जातो...."

या ज्येष्ठ समाजसेवक... एक जाणिवा समृद्ध असणाऱ्या कवी... "बाबा आमटें" च्या ओळी... 

वंदनीय "सुधाकरपंत परिचारक" ... यांच्या जाण्याने झर्र्कन....डोळ्यांपुढे आल्या...!

"माणसानं कसं समुद्रासारखं रहावं...

भरतीचा "माज" नाही...

ओहोटीची "लाज" नाही.. 

तरीही... "अथांग"...! --- या "अथांग"तेत बसणारं राजकारणातील, समाजकारणातील "अध्यात्म" समजलेलं एक राजकारणापालिकडचं... समाजहित जपणारं... "संन्यस्त" व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी आमदार श्रद्धेय "सुधाकरपंत परिचारक"....आदरानं सर्वजण त्यांना... "मोठे मालक" म्हणत... !

ते आज आपल्यात नाहीत..

ही वस्तुस्थिती मान्य करावी लागली तरी.. 

स्मृतिरुपाने... आज ते प्रत्येकाच्या मनात "अमर" राहणार आहेत...!

आजच्या बदलत्या, गढूळ होत चाललेल्या राजकारणाच्या प्रवाहातही... 

"आदरणीय सुधाकर परिचारक" यांच्यासारखी... निस्पृह माणसं 

"गंगे" च्या निर्मळ प्रवाहासारखी 

वाहत होती...! 

त्या काही प्रमाणात गढूळ होत चाललेल्या प्रवाहाबरोबर वाहत असताना त्यांचं निर्मळ वाहणं हे शुद्ध "पाऱ्यासारखं" होतं...! 

राजकारणानंतर पुढं जाऊन असणाऱ्या सहकार आणि समाजकारणात सोबत असलेल्या या गढूळ प्रवाहाचं Purification करण्याची कार्यक्षमता ...

"मोठ्या मालकांच्या" आचरणात होती....!

सोन्याला सुद्धा कसास उतरवून शुद्ध करण्याची कला व सामर्थ्य या पाऱ्यासारख्या"शुभ्र" व्यक्तीत होतं....!अनेक कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या सहवासात काही क्षण घालवता आले हे मीच नव्हे तर आपण सर्वच जण एक भाग्य समजतो...!

श्री विठ्ठलाच्या मंदिरातील "गरूडखांबास" जसं महत्व आहे... त्याप्रमाणं आज राजकारण व समाजकारणामध्ये... या परिचारक घराण्यातील... "मोठे मालक"रुपी.. "गरूडखांबास" आहे... ! अनेकजण या खांबाभोवती वावरत....

त्याच्या आधाराने राजकारणात.... समाजकारणात यशस्वी झाले...! प्रत्येक वेळी या "गरूडखांबाच्या" सहवासात असताना त्यांच्यातील सत्तेचा, पदाचा कोणताही दर्प आम्हाला जाणवला नाही.. त्यांच्या सहवासात नेहमी... 

"अबीर-बुक्क्याचा"...सुगंधच जाणवला...! 

हल्ली बऱ्याचजणांच्या गुणगौरव... सत्कार समारंभास ... कार्यक्रमाआधी किंवा नंतरच्या दोन-चार लोकांच्या गप्पांच्या कोंडाळ्यात असताना ...

"मोठ्या मालकांचं".... एकूणच कणखर व्यक्तिमत्व "भावनिक" झाल्यासारखं वाटलं...! 

"डोळे मोठे करून...हाताची चार बोटं चेहऱ्यावर आणून ते आपला भावपूर्ण आवेग आवरताना दिसले...! मध्यंतरी गप्पांच्या ओघात जुने काही राजकारणातील किस्से सांगताना... "माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील... माजी आमदार स्व. शंकररराव मोहिते पाटील....माजी आमदार स्व. औदुंबरआण्णा पाटील.." यांच्याबद्दल बोलतांना... "खरच ही.. मोठी माणसं होती..." असं म्हणत आवंढा गिळत... धोतराने चेहरा पुसताना त्यांना पाहिल्यावर... मलाच ...

"खरच हा .... केवढा मोठा माणूस.."

आपण प्रत्यक्षच पाहतोय याची प्रकर्षाने जाणीव झाली.

राजकारण-समाजकारण- कौटुंबिक आस्था यांची एकमेकांत गल्लत न करता... "दुधातून पाणी बाजूला काढल्यासारख्या" या गोष्टी वेगवेगळ्या पातळीवर ठेऊन जगलेला ...

एक "राजहंस"... 

म्हणजे वंदनीय "स्व. सुधाकरपंत परिचारक"...!

आज असंख्य माणसांच्या गर्दीतून.... हा "राजहंस"... आमच्यापासून दूर जाताना...

"संत कबीरांच्या"... 

"उड़ जाएगा हंस अकेला....

जग दर्शन का मेला..." 

दोह्यांचा अर्थ उमगतो....!

त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली

मंदार मार्तंड केसकर व केसकर परिवार

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget