पंढरपूर // प्रतिनिधी
गाईच्या दुधाला ३० रुपये दर मिळावा, १० रुपये अनुदान आणि दूध पावडर निर्यातीला प्रति किलो ५० अनुदान द्यावे आदी मागण्यासाठी आज पटवर्धन कुरोली येथे बळीराजा शेतकरी संघटना व महायुतीच्या वतीने संयुक्तरित्या दूध दरवाढ आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी गावातील शंभू महादेवाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.. राज्य सरकारने गायीच्या दुधाला ३० रुपये व दहा रुपये अनुदान व दूध भुकटिला 50 रुपये मिळावेत. यासाठी हे आंदोलन पार पडले यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) जवळेकर यांनी सांगितले की,गाईच्या दुधाला ३० रुपये दर मिळावा, १० रुपये अनुदान आणि दूध पावडर निर्यातीला प्रति किलो ५० अनुदान द्यावे आदी मागण्या पूर्ण करा अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा जवळेकर यांनी दिला आहे.
यावेळी बळीराजा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,समाजसेवक प्रतापसिंह चंदनकर,स्वाभिमानीचे कांतीलाल नाईकनवरे,भाजपचे गोपाळ पाटील,पप्पू नाईकनवरे,विलास खेडेकर,हनुमंत नाईकनवरे,प्रविण नाईकनवरे,बळीराम खेडेकर,गणेश शिंगाडे,गणेश कोळसे इतर दूध उत्पादक उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.