बेकायदा वाळू साठा पोलिस कर्मचार्‍यास भोवला...

 






तहसीलदारांनी शेतजमीनीवर  बोजा चढविण्ययाचे काढले आदेश...


अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल  झेंडे  त्या पोलिस कर्मचार्‍यावर काय कारवाई करणार ? याकडे  लागले नागरिकांचे लक्ष......

 

सोलापुर प्रतिनिधी:- मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक गजानन पाटील ( रा. लक्ष्मी दहिवडी) यांनी 4 ब्रास बेकायदा वाळू साठा केल्याप्रकरणी तहसीलदार यांनी 1 लाख 56 हजार रुपये इतका दंड शासकीय खजिन्यात जमा करण्याचे आदेश पारित केले असतानाही ती रक्कम न भरल्याने  तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी त्यांच्या 7/12 उतार्‍यावर त्या रकमेचा बोजा नोंद करण्याचे  फर्मान संबंधीत तलाठयाला काढले आहे.बैलगाडीतुन वाळू वाहातूक करणार्यावरही कारवाई केली जाते.आता  अतिरिक्त पाेलीस अधिक्षक अतुल झेंडे  काय कारवाई करणार ? याकडे तमाम नागरीकांचे लक्ष लागून राहीले आहे.

लक्ष्मी दहिवडी येथील मूळ रहिवासी असलेले व मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक गजानन पाटील यांनी गावात 4 ब्रास अनधिकृत  वाळूसाठा केला होता. याबाबतची तक्रार नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी सदर गावच्या तलाठयांना पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पंचनामा व  अहवालानुसार पाटील यांना  1 लाख 56 हजार इतका दंड महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(7) अन्वये करून दंडाची रक्कम शासकीय खजिन्यात जमा करण्याचे आदेश पारित केले होते. या वाळूसाठयावर त्याच गावचे नागनाथ गुरव यांनीही  हा साठा माझाच असल्याचा दावा केल्याने तहसीलदार यांनी दोघांनाही दंड भरण्याचे आदेश काढले होते. आदेशानंतर दिलेली मुदत संपल्याने पुन्हा नव्याने आदेश काढून आजतागायत दंडाची रक्कम जमा न केल्याने त्या दोघांच्या  7/12 उतार्‍यावर 1 लाख 56 हजार इतका बोजा नोंद करण्याचे आदेश  सदर गावच्या तलाठयांना देवून या कामी दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेवून उतार्‍यावर नोंद केल्याचा अहवाल इकडील कार्यालयास सादर करावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.  सदर पोलिस कर्मचार्‍याने जालना जिल्हयातील गोदावरी नदीतून  दि. 24/5/2019  रोजी वाळू आणल्याची पावती गौण खनिज विभागाकडे सादर केली आहे. मात्र लक्ष्मी दहिवडी येथील वाळू साठा हा  जून महिन्यातील असल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. मागील एक वर्षापुर्वीच्या पावत्या जोडण्यात आल्याने महसूल अधिकार्‍यांनी त्या रिजेक्ट करून कारवाईचे  फर्मान काढले आहे. दरम्यान या आदेशामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.सर्वसामान्य नागरिकांनी बैलगाडीने वाळू नेल्यास पोलिस प्रशासन चोरीचा गुन्हा दाखल करते तर महसूल विभाग दंडात्मक कारवाई करते. या पोलिस कर्मचार्‍याने खाकी वर्दीचा गैरवापर करत बेकायदा वाळू घेवून जाणार्‍या वाहनावर कारवाई करण्याऐवजी स्वतःच्या  फायदयासाठी त्याचा वापर केल्याची चर्चा  दहिवडी पंचक्रोशीतून होत आहे.सोलापूर शहरातील  एका पोलिस कर्मचार्‍याने वाळूच्या वाहनात भागिदारी केल्याने पोलिस आयुक्तांनी त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केली. आता पोलिस अधिक्षक मनोज पाटील पोलिस आयुक्ताप्रमाणे या पोलिस कर्मचार्‍यावर  कारवाई करणार की पाठीशी घालणार याकडे जिल्हयातील सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget