पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गटात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यानी कोरोनावर यशस्वीपणे मात करून नुकतेच घरी परतले आहेत.
सध्या कोरोनाचे रुग्ण सर्वत्र वाढत आहेत. भाळवणी गावात ५० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्याच बरोबर भंडीशेगाव, वाडी कुरोली, पिराची कुरोली, शेंडगे वाडी,धोंडेवाडी,पळशी या गावात कोरोना रुग्ण वाढत आहेत.तर जैनवाडी, लोणारवाडी ही गावे कोरोना मुक्त झाली आहेत.
यावेळी संभाजी शिंदे यांनी सांगितले की,भाळवणी परिसरातील ग्रामस्थांनी कोरोनास घाबरून जाऊ नका. आपल्या घरा जवळ कोरोना रुग्ण आढळल्यास घरातील सर्वानी रैपीड टेस्ट करून घ्यावी. डॉक्टर सांगतील तशी औषधे व गोळ्या घ्यावीत.रोज सकाळी संध्याकाळी गरम पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाणी पिण्यासाठी वापरावे.काढा घावा. व्यायाम व योगासने करावीत.नेहमी आनंद राहावे.हलका आहार घ्यावा.आणि महत्वाचे म्हणजे मनात सकारात्मक विचार करावा.मास्क वापरा, हात धुण्यासाठी सैनिटायझरचा वापर करा.घरात बसा, सुरक्षित राहा. आपल्या सर्वांचे आशिर्वाद व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची कृपा व शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसैनिक, डॉक्टर,ग्रामस्थ यांच्या सहकार्यायामुळेच मी कोरोनावर यशस्वीपने मात केली आहे.हा कोरोना कोणालाही होऊ नये म्हणून मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.