लक्षात ठेवा सरकार हे फडणवीस-राऊतांच्या भेटीवर NCP नेत्याने दिला इशारा

वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

नेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अखेर या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकार हे एकटी शिवसेना चालवत नाही, अशी आठवण करून दिली आहे.     'संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. पण, ही त्यांची व्यक्तिगत किंवा सामाजिक भेट असेल. या भेटीचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण, शिवसेना ही काही एकटी सरकार चालवत नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यांच्यासोबत आहे', अशी आठवणच राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन यांनी शिवसेनेला करून दिली.तसंच, 'संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी असा कोणताही राजकीय अधिकार दिलेला नाही. मुळात शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये समन्यवाची भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही, असंही  माजिद मेमन यांनी स्पष्ट केले.त्याचबरोबर, 'शिवसेनेचे खासदार  संजय राऊत हे कायम चर्चेत राहत असता. दररोज या ना त्या मुद्द्यावरून ते कायम बातम्यांमध्ये दिसत असतात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जितके चर्चेत राहत नाही, तितके राऊत चर्चेत असतात', असा टोलाही मेमन यांनी लगावला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget