आरटीओ आणि टिपर चालकाचा सिनेस्टाईल थरार

 


करकंब मधील घटना,एका तासात 25 ते 30 किमी पाठलाग


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

रिकामा चाललेल्या टिपरला आरटीओ नी थांबविला आणि चालकाला माहिती विचारायला सुरवात केली तोपर्यंत टिपर चालकाने सुसाट वेगाने टिपर पळविला.आरटीओने टिपर पकडण्यासाठी एका तासात तब्बल 25 ते 30 किमी पाठलाग केला तोही एखाद्या सिनेस्टाईल पद्धतीने आणि अखेर टिपर पकडला.हाच सिनेस्टाई थरारक  अनेकांनी आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षात अनुभवला.सदर घटना सोमवारी सायंकाळी चार ते सहा वाजनेच्या सुमारास करकंबमध्ये घडली आहे.

      सोमवार दि. 26 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन ते चार वाजनेच्या सुमारास आरटीओ निरीक्षक महेश रायबान व त्यांची टीम करकंब येथील जळोली चौक येथे वाहन तपासणी करून  कारवाई करीत होते.याच दरम्यान येथून रिकामा टिपर रस्त्यावरून जात असताना महेश रायबान व त्यांच्या टीमने टिपर अडविला आणि टिपरचालकाला टिपर संबंधित माहिती विचारताच चालकाने आरटीओच्या भीतीने टिपरसह धूम ठोकली त्याच वेळी महेश रायबान व त्यांच्या टीमने टिपरचा पाठलाग करण्यास सुरू केली. टिपर चालकाने जळोली चौकातुन जोराच्या वेगाने नेमतवाडी चौकात आला आणि नेमतवाडीच्या दिशेने टिपर सुसाट वेगाने पळविला तेथून पेहे येथे जाऊन बादलकोट रस्त्यांनी बादलकोट गाठले.रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यातून टिपर सुसाट सुटल्याने रस्त्यात टिपरच्या दोन्ही बॅटऱ्या तुटून पडल्या.पुढे बादलकोट वरून टिपरने थेट सांगवी पुलावरून करकंबच्या दिशेने कूच केली.पुढे खपाले वस्ती पासून जळोली रस्ता ओलांडून बोचरे वस्ती शाळे पासून घोटी रस्ता येईपर्यंत मागे धुरुळ्याचे लोटच्या लोट हवेत पसरत होते.घोटी रस्त्या लागल्या नंतर टिपर चालकाने आपला मोर्चा पुन्हा करकंब दिशेने वळविला आणि देशमुखमळ्या जवळ असलेल्या पाझर तलावा पासून आडराणाच्या मार्गाने टेंभुर्णी करकंब महामार्ग गाठून करकंबच्या दिशेने सुसाट वेगाने पळवीत असलेल्या टिपरला आरटीओच्या गाडीने ओहरटेक करून गाडी आडवी घालून टिपरचालकाला अनवते वस्ती शाळे जवळ थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी आरटीओ आणि टिपरचालक यांच्यात दहा मिनिटे सिनेस्टाई धुमचक्री सुरू होती टिपर चालक टिपर न थांबविता पळून जाण्याचा मनस्थितीत असल्याने शेवटी महेश रायबान व त्यांची टीम गाडीतून उतरली आणि रायबान यांनी कमरेचा पिस्तुल काढून टिपरच्या दिशेने रोखून 'टिपर बंद कर अन्यथा गोळी घालीन' असा आवाज दिल्याने चालकाने टिपर बंद केला आणि आरटीओच्या टीमने चालकाला टिपर मधून खाली ओडून चांगलाच चोप दिला त्यावेळी याठिकाणी अनेक नागरिकांनी चाललेला प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती आणि 25 ते 30 किमी पाठलाग करीत असलेल्या थरारावर अखेर पडदा पडला.


चौकट


- कुत्र्याला गमवावा लागला जीव

आरटीओची सायरन वाजवीत गाडी पाठलाग करीत असल्यामुळे भीतीने टिपरचालक जिवाच्या आकांताने टिपर सुसाट वेगाने पळवीत होता प्रसंगी रस्त्यावर असलेले गुडघाभर खड्डे छोटी मोठी वळणे न पाहता टिपर दिसेल त्या खराब रस्त्याने पळवीत असल्याने रस्त्यावर असलेले नागरिक जीव मुठीत धरून रस्त्यावरून बाजूला होत होते आणि टिपर आणि आरटीओची गाडी पुढे गेल्यानंतर आपला जीव सावरत रस्त्यावर येऊन काय प्रकार चालला आहे ते पहात होते परंतु नेमतवाडीत टिपर उसाच्या ट्रेलरला घासल्याने अनर्थ टळला परंतु ट्रेलरचे थोडे नुकसान झाले अशात बादलकोट येथे टिपरच्या दोन्ही बॅटऱ्या तुटून पडल्या तरीही टिपर सुसाट वेगाने पळवीत पुढे पांढरे वस्ती येथे एका कुत्र्याला टिपरची ठोस बसल्याने कुत्र्याला जीव गमवावा लागला परंतु सुदैवाने इतर अनुचित प्रकार घडला नाही.


आरटीओ आणि टिपर चालक यांच्यात अंगाचा थरकाप उडवणारा एक तास सिनेस्टाई थरारक प्रकार सुरू होता.अनेक नागरिकांचे जीव धोक्यात घालून आरटीओनी टिपरचा पाठलाग करण्याचा एवढा अट्टाहास करून केवळ टिपरचे पासिंग नूतनीकरण, रिप्लेकटर,लर्निंग लायसन,पीयुशी अशी एकूण 11 हजार रुपयेची दंडात्मक कारवाई केली मग या त्रुटी तर अनेक  वाहनामध्ये आढळून येत असतात मग आरटीओनी एवढा अट्टाहास कशासाठी केला तसेच अनेक वेळा ओव्हर लोड वाहतूकही रस्त्यावरून आरटीओ समोरून सुरू असते मग त्यावर कारवाई का होत नाही? याबाबत नागरिकांमधून उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget