वृत्तसंस्था // प्रतिनिधी
लॉकडाऊन काळातील संपूर्ण विज बिल माफ करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ने सोलापूर महावितरण मुख्यालयाला 'स्वाभिमानी'च्या वतीने कुलूप ठोकण्यात आले. ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विजबिल देणाऱ्या महावितरणचा यावेळी निषेध करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजू शेट्टी साहेब व चळवळीतील जेष्ठ नेते एन.डी. पाटील सर यांच्या नेतृत्वात आज (दि.27 ऑक्टोबर 2020) राज्यभर वीजबिल माफीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे..जर सरकारने वीजबिल माफ केले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेनं यावेळी दिला..या आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता..
आंदोलनात 'स्वाभिमानी'चे महम्मद पटेल, तानाजी बागल,विजय रणदिवे, सचिन पाटील, रणजित बागल, अजित बोरकर ,सचिन मस्के, कांताभाऊ नाईकनवरे,इ.उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.