महिला बचत गटांचे संपूर्ण कर्ज माफ करा - जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने,प्रदेश सरचिटणीस तथा सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा.दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष मा.प्रशांत नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२७.१०.२० रोजी नळदुर्ग येथे बचत गटांच्या महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.
सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटात संपूर्ण जग सापडले असून,सरकारने लाॅकडाऊन सुरू केले आणि लोकांचे उद्योग धंदे बंद पडले.हातावरचे पोट असणार्यांना दररोजचा चरितार्थ चालविणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र मायक्रो फायनान्स च्या वसुली अधिकार्यांनी
महिला बचत गटांतील महिलांना कर्ज वसुली साठी तगादा लावून सक्तीने कर्ज वसुली चालुच ठेवली होती. जिथे खायचे वांदे तिथे कसले कर्ज फेडणार? असा गंभीर प्रश्न बचत गटांतील महिलांना पडला होता.ही बाब मनसेच्या सरचिटणीस मा.दिलीप बापू धोत्रे यांच्या लक्षात येताच त्यांनी या महिलांना एकत्र करून मायक्रो फायनान्स व बॅंका यांच्या सक्तीच्या वसुली विरोधात व सरकारने महिला बचत गटांच्या महिलांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.यासाठी पंढरपूर, लातूर व उमरगा येथे महिलांचा महामोर्चा नुकताच काढला होता.याची गंभीर दखल घेऊन पुणे विभागीय आयुक्त यांनीही सक्तीची वसुली करू नये याबाबत आदेश काढले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स व बॅंकांनी आपली सक्तीची वसुली सुरूच ठेवली होती. यामुळे त्यांना वठणीवर आणण्यासाठी व महिला बचत गटांतील हजारो महिलांचे संपूर्ण कर्ज करण्यात यावे.यासाठी आज या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख, शहरसचिव प्रमोद कुलकर्णी, जिल्हासचिव ज्योतिबा येडगे, उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव, अविनाश साळुंखे, उमरगा तालुकाध्यक्ष हरी जाधव व जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी तुळजापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जून कुंभार, लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मयुर गाढवे, राहूल गायकवाड,धनाजी साठे,ॠषि माने यांच्यासह तुळजापूर तालुक्यातील बचत गटांच्या हजारो महिला उपस्थित होत्या.मोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्हासचिव ज्योतिबा येडगे,जनहित व विधी विभागा तालुकाध्यक्ष अॅड.मतिन बाडेवाले, शहराध्यक्ष अलिम शेख,शहरसचिव प्रमोद कुलकर्णी,उपशहराध्यक्ष रमेश घोडके,सूरज चव्हाण, भाऊराज कांबळे,शिरीष डुकरे, यांच्या सह नळदुर्ग शहर व तालुक्यातील मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.