उर्मिला मातोंडकरांना काँग्रेसने ऑफर दिलेली, त्यांनी नाकारली; वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

राज्यपाल नियुक्त 12 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. या जागांचा प्रस्ताव राज्यपालांना पाठविण्याचेही ठरले आहे. यामध्ये एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे उर्मिला मातोंडकर यांचे. उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी उमेदवारीस होकार दिल्याचे बोलले जात आहे. यावर काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने विधानपरिषदेवर जाण्याची ऑफर दिलेली. मात्र, त्यांनी विधानपरिषदेवर जाण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले होते. आता त्यांनी शिवसेनेवकडून जावे किंवा राष्ट्रवादीकडून याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच राज्य सरकराने मराठा आरक्षणाच्या जागा वगळून भरती करावी, अशा मागणीचा पुनरुच्चार केला. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget