सर्वसामान्यांना मोठा दिलासा, CNG-PNG च्या दरात घट, जाणून घ्या नवीन भाव




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (आयजीएल) शनिवारी सीएनजी(CNG) आणि पीएनजीच्या (PNG) किंमती कमी केल्यामुळे कोरोना विषाणूच्या साथीच्या दरम्यान सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी आयजीएलने (IGL) ग्राहकांना याबाबत माहिती दिली. आयजीएलने दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतील.


आता किती मिळेल प्रति सीएनजी ?


दिल्लीत सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो १.५३ रुपयांची घसरण झाली. यानंतर दिल्लीत सीएनजीची किंमत आता ४२.७० रुपये प्रति किलो झाली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये प्रतिकिलो दर १.७० रुपयांनी कमी झाला.


येथे नवीन आता ४८.३८ रुपये प्रति किलो आहे. मुझफ्फरनगरमध्ये सीएनजीची किंमत ५६.५५ रुपये प्रतिकिलोवर आली आहे. त्याचप्रमाणे करनाल आणि कैथल मध्ये सीएनजीची नवीन किंमत ५०.६८ रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर रेवाडी आणि गुरुग्राममधील सीएनजीची नवीन किंमत. ५३.२० रुपये आणि कानपूर जिल्ह्यात ५९.८० रुपये प्रति किलो झाली आहे.


पीएनजीची नवीन किंमत काय आहे?


आयजी : आज सीएनजीसह देशांतर्गत पीएनजीच्या किंमती कमी केल्या. दिल्लीत पीएनजीची किंमत १.०५ रुपयांनी कमी करुन २७.५० रुपये प्रति एससीएम केली. पूर्वी दिल्लीत पीएनजीची किंमत २८.५५ रुपये होती. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये पीएनजीची किंमत १ एससीने कमी करुन २७.४५ रुपये प्रति एससीएम केली. करनाल आणि रेवाडीमध्ये पीएनजीची किंमत १.०५ रुपयांनी कमी होऊन आता ती २७.५५ रुपये झाली आहे. पूर्वी पीएनजीची किंमत २८.२० रुपये होती. मुझफ्फरनगरमध्ये ते प्रति एससीएम ३२.७५ रुपयांना विकले जाईल.


दर ६ महिन्यांनी निश्चित केल्या जातात किंमती


दिल्लीतील आयजीएल सुमारे ९. ५ लाख कुटुंबांना पीएनजी पुरवतो. तर नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, मुझफ्फरनगर, करनाल आणि रेवाडी येथे ५ लाख घरांना पीएनजी पुरवठा करते. दर ६ महिन्यांनी नैसर्गिक वायूचे दर निश्चित केले जातात. दरवर्षी १ एप्रिल आणि १ ऑक्टोबरपासून नवीन नैसर्गिक गॅस किंमती लागू केल्या जातात. 


Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget