सोलापूर // प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवार मा. जयंत आसगावकर, पुणे पदवीधर मतदारसंघ उमेदवार मा. अरुण लाड यांच्या निवडणुकीसंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेस नगरसेवक, नगरसेविका, पक्षाचे उमेदवार, ब्लॉक फ्रंटल, पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे संपन्न झाली. यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, सोमपा गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर नालिनीताई चंदेले, नगरसेवक तौफीक हत्तुरे, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, फिरदोस पटेल, अनुराधा काटकर, परवीन इनामदार, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, भारत जाधव, आदि प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले कि महाविकास आघाडीच्या पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवार मा. जयंत आसगावकर, पुणे पदवीधर मतदारसंघ उमेदवार मा. अरुण लाड यांच्यासाठी सर्व शिक्षक व पदवीधर मतदारांना विनंती करते कि या दोघांना मतदान करुण प्रचंड बहुमताने विजय करा. आपली महाविकास आघाडी असल्यामुळे आत्ता आपल्या सर्वांचा विरोधक एकच आहे तो म्हणजे भाजप, हे महाविकास आघाडीचे पहिलीच निवडणूक आहे. आपण सर्वजण लोकांच्या विकासासाठी एकत्र आलो तर आपली ताकद काय आहे हे विरोधकांना दिसेल म्हणुन महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा आणि शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करुण निवडून देण्याची विनंती आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
या बैठकीस माजी नगरसेवक दत्तुअन्ना बंदपट्टे, मकबूल मोहोळकर, अनिल पल्ली, NK क्षीरसागर, संजीवनी कुलकर्णी, जगदेवी नवले, महादेवी अलकुंटे, अरुण साठे, सुरेश तोड़करी, केशव इंगळे, हाजिमलंग नदाफ, शौकत पठाण, श्रीधर काटकर, राहुल बोळकोटे, चक्रपाणी गज्जम, पुरुषोत्तम श्रीगादी, अनिल मस्के, मल्लीनाथ सोलापूरे, विवेक कंन्ना, संतोष अट्टेलुर, राजाभाऊ महाडिक, सुनील व्हटकर, संजय भंडारे, पवन गायकवाड़, शशिकांत जाधव, शाहु सलगर, प्रमिला तुपलवंडे, यांच्यासह इतर उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.