पो.नि.नामदेवराव शिंदे साहेब यांचे काम पहात रहावे वाटते जिथ बदलुन जातात तिथलेच होऊन जातात
बारामती : लाच देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा आहे, पोलिस स्टेशन येथे सर्व कामे विनामूल्य केली जातात, काही तक्रार असल्यास संपर्क साधा. ही पाटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कार्यालयातील नसून तर ती बारामती शहर पोलिस ठाण्यात लावली आहे. ही पाटी हा सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
नूतन पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर पोलिस ठाण्याचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुखी व्हावी या दृष्टीकोनातून बरेचसे बदल केले. पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना विश्वासाचे वातावरण मिळावे व पोलिस आपल्या मदतीसाठी आहेत, ही भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी या उद्देशाने शिंदे साहेब यांनी आपल्या केबिनमध्ये अशी पाटीच लावली आहे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.