विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी मनसेच्या वतीने निवेदन

 


पंढरपूर // प्रतिनिधी 

कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव असल्याने लाॅकडाउन करण्यात आले यामुळे  सर्वच गोरगरिब जनता पुर्णतः बेरोजगार झाली आहे याचाच फटका गोरगरिबांना  विद्यार्थ्यांना बसला आहे अशा परिस्थितीत विद्यालय, महाविद्यालये,काॅलेजेस मोठ्या प्रमाणात आकारात आहे तरी विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी, सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरावेत, सर्वांना ऑनलाइन शिक्षण द्यावे या व इतर मागण्यासाठी स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज पंढरपूर येथे महाराष्ट् नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस मा.दिलीप(बापू) धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीचे  संचालक श्री पवार सर यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी मनसेच्या मागण्यांच्या विचार करून निश्चितपणे विद्यार्थ्यांना न्याय देऊ, कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही असे कॉलेज प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.


यावेळी उपजिल्हा अध्यक्ष दिलिप पाचंगे, शहरअध्यक्ष सिद्धेश्वर गरड,विभाग अध्यक्ष नागेश इंगोले,प्रथमेश पवार, आकाश पवार ,इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget