सोलापूर // प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर मोजे कुंभारी येथे स्वर्गीय मिनाताई ठाकरे नावाने असलेल्या विडी घरकुलला ठाकरे सरकार मदत करणारच असे भावनात्मक वक्तव्य माँ साहेब विडी घरकुलचे संस्थापक विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या सन २०१ ९ - २० या सालाच्या वार्षिक सर्व साधारण सभेत बोलताना केले. दक्षिण सोलापूर कुंभारी येथे स्व. मिनाताई ठाकरे सभागृहात माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेचे वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न झाले. सभेच्या अध्यक्षपदी संस्थापक विष्णु कारमपुरी (महाराज) हे होते.
प्रारंभी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर प्रस्तावना व्यवस्थापक श्रीनिवास चिलवेरी यांनी केले . यावेळी संस्थेचे अकॉउंटन श्री. लक्ष्मीकांत कोडम यांनी वार्षिक अहवाल हिशोब सादर केले त्यास सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर सभा अध्यक्ष कारमपुरी (महाराज) यांनी संस्थेच्या विकासासाठी व नागरी सुविधा आणि मुलभुत सुविधांसाठी सर्व सभासद विडी कामगार बंधु - भगिनी एकजुटीने संस्थेच्या पाठीशी उभे रहावे. असे आवाहन केले. स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या नावाने असलेल्या घरकुलला ठाकरे सरकार मदत करतील असे म्हणाले. शेवटी अकाउंटन लक्ष्मीकांत कोडम यांनी आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.
सदर सभेत अॅड. मुनिनाथ कारमपुरी, रामचंद्र गडगी, अंबादास सिरसाल, श्रीनिवास बोगा, पप्पु शेख, नरेश अन्नलदास, सिद्राम चिलवेरी, गणेश म्हंता, विठ्ठल कुन्हाडकर, संच्याराणी कुऱ्हाडकर, अनिता बगिरी, अर्चना चिलका, बिपीन साबळे, गुरुनाथ कोळी, प्रशांत जक्का, प्रसाद जगताप, यांच्यासह माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना विष्णु कारमपुरी (महाराज) विडी कामगार व गृहनिर्माण संस्थेचे सभासद दिसत आहेत

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.