कैकाडी समाजाचे प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावणार:- आमदार यशवंत(तात्या)माने



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील विविध भागात अल्प प्रमाणात असलेल्या कैकाडी समाज आजही अनेक घटकापासुन विकासापासून वंचीत आहे. त्या कैकाडी समाजच्या अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत.ते सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार शरदचंद्र पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे,जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राधान्याने लक्ष घालून त्वरित मार्गी लावणार असल्याची माहिती कैकाडी समाजाचे एकमेव आमदार यशवंत माने यांनी दिली आहे.

सोमवार(दि२८)रोजी महाराष्ट्रातील कैकाडी समाजाच्या सर्व संघटना एकत्रित येवून आमदार यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज कृती समितीची स्थापना करण्यात आले.त्यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार यशवंत माने बोलत होते.    

यावेळी स्थापना करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज कृती समिती च्या अध्यक्ष पदी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी सभापती हनुमंत माने यांची निवड करण्यात आली.यावेळी कृती समिती च्या वतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळातील कैकाडी समाजाचे एकमेव आमदार असलेले यशवंत माने यांचा सत्कार करण्यात आला.       

यावेळी माजी सचिव मंत्रालय लालासाहेब जाधव,रोहिदास जाधव,ज्ञानेश्वर जाधव,रघुनाथ जाधव,पोपट गायकवाड,जयशंकर माने,पोपट गायकवाड,नारायण जाधव,विश्वासराव माने,सोमनाथ जाधव,बाबु पवार,प्रा.बाळासाहेब माने सह महाराष्ट्रातील  नागपूर,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,सोलापूर,औरंगाबाद,अहमदनगर,जालना ,बुलढाणा सह अन्य जिल्ह्यातील प्रमुख  पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वरूपचंद गायकवाड यांनी केले तर आभार सोमनाथ जाधव यांनी मानले.

महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज कृती समिती च्या बैठकीत मार्गदर्शन करताना आ.यशवंत माने सह अन्य छायाचित्रे (छाया:संतोष ननवरे)

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget