समाजसेवक नितीन काळे यांना सरपंच परिषदेचा युवा रत्न पुरस्कार जाहीर!



सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाजसेवक युवानेते नितीन काळे यांना सरपंच संघटनेच्या राज्यस्तरीय युवा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.सरपंच सेवा संघटनेच्यावतीने शिर्डी येथे विविध पुरस्काराचे वितरण राज्यपाल भगतसिंग कोशारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ह भ प इंदूरीकर महाराज व आजी-माजी मंत्री आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये 6 जानेवारीला शिर्डी येथे संपन्न होणार आहे सरपंच सेवा संघटनेच्यावतीने या वर्षीचा राज्यस्तरीय युवा रत्न पुरस्कार सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाजसेवक नितीन पांडुरंग काळे यांना जाहीर झाला आहे. नितीन काळे बऱ्याच दिवसापासून समाजसेवा करत आहेत. व युवकांचे प्रश्न सोडवत आहेत. कोणाच्याही मदतीला ते धावून जातात. नितीन काळे यांचा प्रवास  तसा खडतरच आहे. ते अनेक संकटांना तोंड देऊन जनतेची सेवा करत आहेत. पण त्यांनी आपली सेवा कधीही थांबवली नाही. ते सतत प्रयत्नशील असतात. कोरोना काळामध्ये देखील त्यांनी चांगल्या प्रकारे काम देखील केले आहे. या कामाची दखल घेऊन त्यांना कोरोना योद्धा म्हणून तब्बल 19 पुरस्कार भेटले. नितीन काळे यांना लहानपणापासून समाजसेवेची आवड आहे व युवकांना चांगल्या प्रकारे ते मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी खूप लहान वयात चांगल्याप्रकारे कामगिरी केल्याबद्दल सरपंच सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे यांनी त्यांना सरपंच सेवा संघटनेचा युवा रत्न पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार राज्यस्तरीय असून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. नितीन काळे यांनी खूप लहान वयात समाजासमोर व युवकांसमोर एक आदर्श घडवत आहेत. त्यांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून काम करावे व जनतेची फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडीतरी सेवा करावी असे नितीन काळे यांनी सांगितले. हा पुरस्कार माझा नसून मला ज्यांनी ज्यांनी वेळोवेळी मदत केली. ज्यांनी मला मोलाची साथ दिली. ज्यांनी मला योग्य मार्गदर्शन केले हा त्यांचा पुरस्कार आहे. असे नितीन काळे यांनी सांगितले. हा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण जनतेचा आहे असेही नितीन काळे यांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनी उपस्थित राहावे असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. व त्यांना पुढील वाटचालीस सर्व जण शुभेच्छा देत आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget