पंढरपूर तालुक्यातील कष्टकरी गोरगरीब नागरिकांची मैत्रेय फायनान्स मुंबईने गुंतवणूक दारांकडून कोट्यावधी रुपये घेऊन फसवणूक केली असल्याची माहिती समोर येत आहे.अशा परिस्थितीत नागरिकांना धीर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप(बापू) धोत्रे यांच्या उपस्थितीत संत तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे मैत्रेय फायनान्स मुंबई यांच्याकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूक दारांचा मेळावा घेण्यात आला यामध्ये मैत्रेय फायनान्स मुंबईने गुंतवणूक दारांकडून कोट्यावधी रुपये घेऊन फसवणूक केली आहे,त्या सर्व गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
[यावेळी धोत्रे, बोलताना पुढे म्हणाले की, या मैत्रेय फायनान्स मुंबई यांच्याकडून फसवणूक झालेले जेवढे गुंतवणूकदार आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचे मानसिक त्रास घेऊ नये, या सर्व विषयांची चर्चा मा.राजसाहेब ठाकरे यांच्याशी करून जेवढे गुंतवणूकदार असतील त्यांना भरपाई मिळवून देण्यास प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.]
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिलिप पाचंगे, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, महिला शहर अध्यक्ष सौ रंजना इंगोले, प्रताप भोसले, नागेश इंगोले, जवंजाळ मॅडम, गायकवाड इत्यादी उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.