पंढरपूर तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून पंढरपूर तालुक्यातील करकंब गटातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पटवर्धन कुरोली येथील ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीस आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाले आहे.
या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पटवर्धन कुरोली येथील कष्टकरी गोरगरीब शेतक-यांचा नेता बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तरुण तडफदार नेतृत्व ज्ञानेश्वर (माऊली) जवळेकर यांनी आपला वार्ड क्रमांक चार साठी आज उमेदवारी अर्ज दाखल भरण्यात आहे. त्यांनी गावातील सर्व तरुण वर्गाला एकत्र आणून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपले पॅनल उभा करण्याचे ठरविले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपूर्णपणे आपण गावाचा व वॉर्डाचा विकास करणार असल्याचे यावेळी ज्ञानेश्वर (माऊली) जवळेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना यावेळी सांगितले. वार्ड क्रमांक चार मधून मी उमेदवारी अर्ज भरला असून सर्व गोरगरीब कष्टकरी जनतेच्या प्रश्नासाठी व गावातील विकासासाठी मी हा उमेदवारी अर्ज भरला आहे.
युवा परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व नवतरुण नवयुवक सर्व गावाचा विकास करणार असल्याचे यावेळी पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांनी स्पष्ट केले.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.