भाजपविरोधी आघाडीला धक्का, कर्नाटकात माजी पंतप्रधानाचा पक्षच भाजपात विलीन होणार?




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

उत्तर भारतात शेतकरी आंदोलनाने राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना, इकडे दक्षिण भारतात वेगळंच राजकारण रंगत आहे. कर्नाटक  विधानपरिषदेत सभापतींना खुर्चीवरुन खाली खेचल्याचं देशाने पाहिलं. या निमित्ताने जवळ आलेले कट्टर विरोधक भाजप  आणि माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांची जनत दल (एस)  मोठा निर्णय घेण्याची चर्चा आहे. माजी पंतप्रधान देवेगौडांचा  पक्ष जेडीएस थेट भाजपमध्येच विलीन होणार असल्याच्या चर्चा कर्नाटकात रंगल्या आहेत. मात्र सध्या तरी दोन्ही पक्षांकडून या चर्चा फेटाळल्या जात आहेत.

देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या घडामोडी नेहमीच दक्षिण भारतात घडत असतात. त्यातल्या त्यात कर्नाटकातील राजकारण तर यासाठीच ओळखलं जातं. जर देवेगौडा आणि त्यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला तर तो भाजपविरोधी आघाडीसाठी मोठा धक्का असेल.

कर्नाटकात नेमकं काय घडलं?

कर्नाटकात सध्या बी एस येडीयुरप्पा यांच्या नेतृत्त्वातील भाजपचं सरकार आहे. कर्नाटक विधानपरिषेदत मंगळवारी 15 डिसेंबरला गोरक्षा विधेयकावरुन  जोरदार राडा झाला. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. हा सगळा गोंधळ शांत करण्यासाठी सभागृहात मार्शल्सना पाचारण करावे लागलं होतं. कर्नाटक सरकारने गायींची रक्षा करणाऱ्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी एक विधेयक सभागृहात मांडले होते. मात्र, या विधेयकामुळे गोरक्षकांना संरक्षण मिळेल, असा विरोधकांचा आक्षेप आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget