शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याची मागणी
सोलापूर // प्रतिनिधी
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर च्या दरात सातत्याने दरवाढ करुण जनतेस लूटत आहे. त्याच प्रमाणे शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणी साठी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सोलापूर पूनम गेट समोर निदर्शने करण्यात आले. यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करुण निषेध ही व्यक्त करण्यात आला. तसेच मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आला.
यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले कि कोरोना महामारीने त्रस्त असून या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. उद्योगधंदे अजून पूर्वपदावर आले नाहीत. बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करत असताना अशा कठीण प्रसंगी केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या किंमतीत दरवाढ करून आणखी एक संकट लोकावर लादले. या दुहेरी संकटाचा सामना करताना सामान्य जनतेची प्रचंड हाल होत असून जून महिन्यापासुन इंधनाच्या दरात वारंवार वाढ केली जात असून ही दरवाढ पाहता पेट्रोलमध्ये प्रतिलिटर चौदा रुपये तर डिझेलमध्ये बारा रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे देशभरात पेट्रोल प्रतिलिटर शंभरीच्या आसपास केले आहेत तर दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोल पेक्षा जास्त महाग आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा विचार करून देशांतर्गत इंधनाचे दर ठरवले जात असताना सध्या ती पारदर्शकता राहिली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य आहे या दुहेरी संकटाचा सामना करीत असताना केंद्र सरकार घरगुती व व्यावसायिक सिलेंडर किंमत गेल्या पाच महिन्यांपासून सातत्याने दरवाढ केली आहे त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती सातशे व्यवसाय सिलेंडर ची किंमत तेराशे रुपयेला जाऊन भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व छोटे उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहेत. महिलांचे बजेट कोलमडले असुन या दरवाढीच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करून ही दरवाढ रद्द करावी अशी मागणी करत आहोत.
या निदर्शने आंदोलनात महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, माजी महापौर आरिफ शेख, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास गुत्तिकोंडा, अरुण साठे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, VJNT युवक अध्यक्ष युवराज जाधव, आझम सैफन, केशव इंगळे, सुमन जाधव, माजी नगरसेवक हारून शेख, जाबीर अल्लोळी, राजन कामत, संध्याताई काळे, किसन मेकाले, हाजिमलंग नदाफ, नागनाथ कदम, मणिकसिंग मैनावाले, मैनुद्दीन शेख, अनिल मस्के, विवेक कन्ना, अप्पासाहेब बगले, चक्रपाणी गज्जम, यशवंत ढेपे, प्रमिला तुपलवंडे, राहुल बोळकोटे, रमेश जाधव, मल्लीनाथ सोलापूरे, VD गायकवाड़, उपेंद्र ठाकर, संघमित्रा चौधरी, शोहेब कडेचुर, रुस्तम कम्पली, मुमताज तांबोळी, शोभा बोबे, रतन डोळसे, अरुणा बेंजरपे, परशुराम सतारेवाले, अभिजीत दासरी, राजेन्द्र शिरकुल, चंद्रकांत टिक्के, मुस्कान शेख, मोनिका सरकार, सोमनाथ व्हटकर, कांतिलाल धोत्रे, अरुणा बेंजरपे, सोपान थोरात, सुभाष वाघमारे, देवेंद्र सैनसाखळे, भारत चौगुले, बाबूलाल जाधव, महबूब मुजावर, अनिता भालेराव, महेश कुंभार, नीता गायकवाड़, मीणा गायकवाड़, दत्तात्रय नामकर, अभिलाष अच्युगटला, शकूर शेख, बसंती सालुंखे, मुनेराबी शेख, आरती सालुंखे, मशरूम कुरेशी, गौरम्मा कांबळे, सविता जगलेकर, संगीता लवटे, सोनाली जाधव, सुजीता कांबळे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.