(चेअरमन कल्याणराव काळे यांनी केला भगीरथदादांचा सन्मान)
सोलापूर प्रतिनिधी:-पंढरपूर तालुक्यातील आर्थिक कणा समजला जाणाऱ्या वेनुनगर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आज चेअरमनपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली यावेळी चेअरमन पदासाठी स्वर्गीय भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ दादा भालके यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली असल्याचे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना प्रशासनाकडून यावेळी जाहीर करण्यात आले आहे.
स्वर्गीय भारत नाना भालके यांचे दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले होते त्यानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पद रिक्त झाले होते या चेअरमन पदासाठी स्वर्गीय भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ दादा भालके यांची वर्णी लागणार असल्याचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून बोलले जात होते त्याचा अनुषंगाने आज श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून s.s. तांदळे यांनी एकमेव भगीरथ दादा भालकी यांचा अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड केली.
यावेळी नूतन चेअरमन भगिरथ (दादा) भालके यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी श्री पांडुरंगाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कल्याणराव काळे, व्यंकट (आण्णा) भालके, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण आबा पवार कारखान्याचे संचालक दिनकर बापू पाटील मोहन (आण्णा) कोळेकर, शालिवाहन तात्या कोळेकर मेजर विलास भोसले, द्रोणाचार्य हाके शरद प्रतिष्ठानचे गणेश (दादा) गोडसे, दत्तात्रय कांबळे, व आदी सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी सर्व भालके प्रेमी नागरिक श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व अधिकारी कामगार व कर्मचारी वृंद याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.