कोरोना लसीकरणाची जबाबदारी शिक्षकांवरच; लसीकरणावेळी आधार आणि पँनची सक्ती



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

कोरोनावरील लस आता अंतिम टप्प्यात आली असून जानेवारी 2021 मध्ये पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लसीचा काळाबाजार होऊ नये म्हणून संबंधितांकडे आधार तथा पॅनकार्ड असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मतदान यंत्रणेच्या धर्तीवर प्रत्येक शंभर व्यक्‍तींमागे एक बुथ तयार केला जाणार आहे. त्याठिकाणी एक पोलिस कर्मचारी व एका शिक्षकाची नियुक्‍ती केली जाणार आहे.राज्यातील जिल्हानिहाय वैद्यकीय कर्मचाऱ्यांची माहिती (खासगी व शासकीय) सार्वजनिक आरोग्य विभागाने मागवून घेतली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सव्वा कोटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. त्यानंतर 28 दिवसाच्या अंतराने दुसरा डोस दिला जाणार असून तत्पूर्वी, पोलिस तथा फ्रंट लाईनवरील कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला जाईल. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्‍तींना तर अंतिम टप्प्यात को- मॉर्बिड रुग्णांना लस दिली जाणार आहे. चार प्रकारची लस तयार करण्यात आली असून त्यापैकी महाराष्ट्रासाठी तोंडावाटे तथा इंजेक्‍शनद्वारे दिली जाणारी लस मिळेल, अशी शक्‍यता सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. त्यादृष्टीने जिल्हा, तालुकानिहाय प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी, आशासेविका व अंगणवाडी सेविकांचा समावेश असणार आहे. दुसरीकडे ऑनलाइन पोर्टलवरील नावांची खातरजमा करण्याची मुख्य जबाबदारी निवडणुकीप्रमाणे शिक्षकांवरच सोपविली जाणार आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget