२००० रुपये उचल! तरुण शेतकऱ्यांकडून मा.खा.धनंजय महाडिक यांचा गौरव!






वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री मुन्न्साहेब उर्फ धनंजय महाडिक यांनी 2020 -21 या गाळप हंगामासाठी पहिली उचल म्हणून दोन हजार रुपये देण्याचे जाहीर केले व त्याप्रमाणे पहिल्या पंधरवड्यातील गाळप झालेल्या उसाचे प्रतिटन 2000 याप्रमाणे ऊस बिलापोटी पहिली उचल भीमा कारखान्याच्या सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी ही पहिली उचल सतराशे रुपये एवढीच देण्याचे परवडते असे जाहीर केलेले होते .परंतु श्री महाडिक यांनी या निर्णयाला बगल देत सोलापूर जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर देण्याचे ठरवले म्हणून अंकोली येथील श्री नानासाहेब मित्रपरिवार यांचे तर्फे श्री धनंजय महाडिक यांचा शाल श्रीफळ व फेटा घालून महाडिक शेड येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री नानासाहेब पवार व व त्यांचे सर्व तरुण सुशिक्षित शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना श्री . महाडिक असे म्हणाले की कोरोना संकटांमुळे नोकरी मिळवणे अवघड झाले असून तसेच नोकरीची उपलब्धता कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांनी निष्ठेने व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती करणे गरजेचे आहे. शेतकरी तरुणांनी व्यसनांमध्ये न अडकता प्रती एकर ऊसाची टनेज कोणत्या पद्धतीने वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पारंपारिक पद्धतीने शेती करण्याचे दिवस आता संपले आहेत याप्रसंगी पुळुज चे श्री. राजू बाबर श्री राजू बाबर जाकिर मुलानी माने बाबर कृष्णाजी बाबर भारत पाटील भारत पाटील शिवाजी गोविंद पाटील प्रा. संग्राम चव्हाण (सर) श्री सुनील चव्हाण उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget