सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे सुवर्णपदक जाहीर




 पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावाचे व भीमा सह कारखान्याचे संचालक मा.दिलीपराव ऊर्फ रामहरी रणदिवे यांचे सूपुत्र तसेच कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रामहरी रणदिवे यांनी उत्तमरित्या कामगिरी बजावल्याबद्दल वनविभाग, महाराष्ट्र शासनातर्फे सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे.

गणेश रामहरी रणदिवे यांचे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक असून त्यांनी अवैध वाहतूक करणारे सुमारे शंभराहून अधिक ट्रक, टेम्पो, पिक-अप, उत्खनन करणारे ट्रॅक्‍टर, जेसीबी तसेच सुमारे 40 हून अधिक ठिकाणी छापे घालून खैर, चंदन, साग, शिसम मौल्यवान प्रजाती जप्त करून सदर वाहने व मुद्देमाल सरकार जमा करून सरकारला कोट्यवधीचा महसूल मिळवून दिला . तसेच अनेक वन्यजीव  व त्यांचे कातडी तस्करी बाबत वन्यजीव गुन्हे उघडकीस आणले आहेत व संवेदनशील क्षेत्रातील अतिक्रमणही काढणे अशा अनेक दंडात्मक कारवाई करुन आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. तसेच त्यांनी धुळे व नंदुरबार येथे कार्यरत असताना आदिवासी विकास योजने अंतर्गत शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केले आहे. 
तसेच सध्याच्या ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी हरिश्चंद्र गडावरील  अतिक्रमणे काढल्याने त्यांचे स्थानिक स्तरावर कौतुक करण्यात आले.

धडाडीचे सहाय्यक वनरक्षक अधिकारी गणेश रामहरी रणदिवे यांना अशा उत्तमरित्या कामगिरी बजावल्याबद्दल वनविभाग, महाराष्ट्र शासनातर्फे सुवर्णपदक जाहीर केले असल्याची माहिती शासन निर्णय द्वारे प्राप्त झाली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget